शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडाचा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 01:22 IST

साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील मोहगाव येथे वऱ्हाड्यांना घेऊन जाणारे ...

कुरखेडा-कोरची मार्गावरील डोंगरगावनजीकची घटनाकुरखेडा (गडचिरोली) : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील मोहगाव येथे वऱ्हाड्यांना घेऊन जाणारे मेटॅडोर वाहन उलटल्याने ४१ वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कुरखेडा-कोरची मार्गावर डोंगरगाव फाट्यासमोर बेडगाव घाटाच्या पायथ्याशी घडली. कुरखेडा तालुक्यातील सावरगाव येथील पुरनशहा वट्टी यांच्या मुलाचे लग्न जुळले असून सदर कुटुंबीय आपल्या नातेवाईकांसह साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी देवरी तालुक्यातील मोहगाव येथे एमएच ३४ एम ७७५ या मेटॅडोर वाहनाने जात होते. दरम्यान, वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने मेटॅडोर बेडगाव घाटाच्या पायथ्याशी उलटला. या मार्गाने वाहनाने येणाऱ्या कोरचीचे नगराध्यक्ष नसरूद्दीन भामानी यांना सदर अपघात निदर्शनास आला. त्यांनी या अपघाताची माहिती जि.प. सदस्य निरांजनी चंदेल, शिवसेना तालुका प्रमुख आशिष काळे, पं.स. उपसभापती बबन बुध्दे यांना भ्रमणध्वनीवरून दिली. या सर्व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तीन खासगी वाहनात सर्व जखमींना टाकून त्यांना कुरखेडाच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर अपघाताची माहिती कळताच पं.स. सदस्य चांगदेव फाये, नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, रवींद्र गोटेफोडे, चंदू नाकतोडे व अन्य कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रूग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या अपघाताची पुराडा पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)अपघातातील जखमींची संख्या ४० वरअपघातातील जखमींमध्ये महागूबाई वड्डे (५०), लक्ष्मी उसेंडी (५०), शशीकला कुमोटी (४५), रूपेश वट्टी (९), धनवंती वट्टी (४५), शेषराव वट्टी (४०), सुमन श्रीराम वट्टी (४५), माणिक कुमोटी (५०) सर्व रा. सावरगाव हे नऊ वऱ्हाडी गंभीर जखमी झाले. या सर्वांवर कुरखेडाच्या उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित ३२ जखमींमध्ये शालिकराम वड्डे (५५), लता वट्टी (३०), जनाबाई गावडे (३५), बाबुराव गावडे (५०), कांताबाई कुमोटी (४०), दादाजी वट्टी (३५), उर्मिला वट्टी (३०), उमाकांत वट्टी (३०), शेवंता वट्टी (५५), कौशल्या नैताम (४५), मुक्ताबाई गावडे (५०), यशाबाई वट्टी (७२), सोनजाम वट्टी (५०), लता हलामी (४५), सिंधू गावडे (३०), शिला वनखी वट्टी (४०), राजेश्वर नैताम (४०), गोमाजी मडावी (५५), दिनकर वट्टी (३०) सर्व रा. सावरगाव, शामशाही होळी (६०), मनोहर गावडे (५५), सुमन मनिराम वट्टी (५५), विश्वनाथ चने (६०) सर्व रा. येंगलखेडा, पे्रमिला दुगा (४५), भाविका उसेंडी (२०), सुमन उसेंडी (५०) रा. कसारी व बळीराम कोडाप (४७) रा. धनेगाव यांचा समावेश आहे. या सर्व जखमींवर कुरखेडाच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.