फिरत्या लोकअदालतीतून ‘न्याय आपल्या दारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:31 IST2018-04-28T00:31:22+5:302018-04-28T00:31:22+5:30
जिल्हा विधीसेवा प्राधिकरणतर्फे ‘न्याय आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मौशिखांब येथील ग्राम पंचायत कार्यालयात शुक्रवारी फिरते लोकअदालत कायदेविषयक शिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.

फिरत्या लोकअदालतीतून ‘न्याय आपल्या दारी’
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा विधीसेवा प्राधिकरणतर्फे ‘न्याय आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मौशिखांब येथील ग्राम पंचायत कार्यालयात शुक्रवारी फिरते लोकअदालत कायदेविषयक शिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात हिंदू विवाह कायदा व बालक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुसरे सहदिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन. पी. वासाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून अधिवक्ता अमित झंझाळ, विधीस्वयंसेविका वर्षा मनवर, पूजा लाटेलवार, उपसरपंच गेडाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मुनघाटे उपस्थित होते.
प्रास्ताविकातून वर्षा मनवर यांनी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. अधिवक्ता अमित झंझाळ यांनी विवादाशिवाय कोणत्याही समस्येवर कशाप्रकारे तडजोड करता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सहदिवाणी न्या. एन. पी. वासाडे यांनी कौंटुबिक हिंसाचार अधिनियम २००५ व हिंदू विवाह कायदा तसेच बाल अत्याचार प्रतिबंधक अधिनियम याबाबत मार्गदर्शन केले. कौंटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडू नयेत याची खबरदारी प्रत्येकानी घ्यावी, तसेच सदर घटना घडल्यास महिलांनी न्यायालयात दाद मागावी. तसेच बालकांवर अन्याय अत्याचार झाल्यास त्यावर परिमार्जन कशा प्रकारे करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार कावळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या कर्मचाºयांनी तसेच विधी स्वयंसेवकांनी सहकार्य केले. यावेळी गावातील बहुसंख्य महिला, पुरूष, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.