लसीकरणासाठी सात तासांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST2021-05-05T05:00:48+5:302021-05-05T05:00:48+5:30

वैरागड परिसरातील चेतन शेंडे, रितेश हर्षे, शेखर रासेकर, चेतन बगमारे, ऋषिकांत तावडे हे युवक दिलेल्या वेळेच्या एक तास ...

Wait seven hours for vaccination | लसीकरणासाठी सात तासांची प्रतीक्षा

लसीकरणासाठी सात तासांची प्रतीक्षा

वैरागड परिसरातील चेतन शेंडे, रितेश हर्षे, शेखर रासेकर, चेतन बगमारे, ऋषिकांत तावडे हे युवक दिलेल्या वेळेच्या एक तास अगाेदर सकाळी ८ वाजता आरमोरी लसीकरण केंद्रावर पोहोचले. ९ वाजले तरी या ठिकाणी आरोग्य कर्मचारी हजर झाले नाही. काही वेळानंतर कर्मचारी आले. मात्र, आरोग्य कर्मचारी कमी असल्याची सबब सांगून सगळ्यांना दोन वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही यासाठी ठरवून दिलेल्या वेळात हजर राहा, असे शासनाचे निर्देश असताना उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी हजर असतानादेखील लसीकरणासाठी सात तास प्रतीक्षा करावी लागली. याबाबत युवकांनी उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची शासनाच्या टोल फ्री क्रमांक १०७५ वर तक्रार केली. त्यानंतर दुपारी दोन वाजता लसीकरण सुरू करण्यात आले. हा अतिशय गंभीर प्रकार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Wait seven hours for vaccination