‘स्वीप’अंतर्गत शहरात मतदार जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:08+5:30

सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी सदर रॅलीला वसतिगृहातून हिरवी झेंडी दाखविली व रॅलीचा शुभारंभ केला. याप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते. या रॅलीमधून नागरिकांना विविध घोषवाक्यांमधून मतदान, मतदार विषयक माहिती देण्यात आली. गडचिरोली मतदार संघातील नागरिकांना मतदानाविषयी लक्ष वेधण्यासाठी व त्यांना आवश्यक माहिती देण्यासाठी स्वीप या मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत रॅलीमधून माहिती दिली.

Voter awareness in the city under 'sweep' | ‘स्वीप’अंतर्गत शहरात मतदार जनजागृती

‘स्वीप’अंतर्गत शहरात मतदार जनजागृती

ठळक मुद्देउपस्थितांना दिली मतदानाची शपथ : रॅली व पथनाट्यातून केले नागरिकांचे प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातर्फे शनिवारी मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. दरम्यान इंदिरा गांधी चौकात पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मतदानाविषयी जागर केला.
सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी सदर रॅलीला वसतिगृहातून हिरवी झेंडी दाखविली व रॅलीचा शुभारंभ केला. याप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते. या रॅलीमधून नागरिकांना विविध घोषवाक्यांमधून मतदान, मतदार विषयक माहिती देण्यात आली. गडचिरोली मतदार संघातील नागरिकांना मतदानाविषयी लक्ष वेधण्यासाठी व त्यांना आवश्यक माहिती देण्यासाठी स्वीप या मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत रॅलीमधून माहिती दिली.
यावेळी स्वीप समितीचे सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ उपस्थित होते. मतदार जनजागृती रॅली शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह ते इंदिरा चौकापर्यंत काढल्यानंतर इंदिरा चौकामध्ये मतदार जनजागृतीवर आधारीत पथनाट्य सादर करण्यात आले. उपस्थित नागरिकांना मतदानाची शपथही यावेळी देण्यात आली. पथनाट्यामध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदान करण्याबाबत सुंदर नाटक मुलांच्या वसतिगृहातील चमुने सादर केले. यावेळी नागरिकांचा व मुलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जाखड यांनी उपस्थितांना यावेळी मतदान करण्याचे आवाहन केले.
रॅलीच्या यशस्वीतेसाठी सहायक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, भिवगडे, रवींद्र गजभिये, पंकज ढवळे, स्वाती पांडे, मुकेश गेडाम, प्रियंका कोवे, सुप्रिया तुलावी, भूपेंद्र गेडाम, अक्षय आत्राम आदींनी सहकार्य केले.

Web Title: Voter awareness in the city under 'sweep'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.