विहिरगाव व कोरचीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

By Admin | Updated: September 3, 2014 23:24 IST2014-09-03T23:24:23+5:302014-09-03T23:24:23+5:30

देसाईगंज तालुक्यातील विहिरगाव व कोरची येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ ३ सप्टेंबर रोजी करण्यात आला.

Vihargaon and Kourga Taluka level sports competition | विहिरगाव व कोरचीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

विहिरगाव व कोरचीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

विसोरा/ कोरची : देसाईगंज तालुक्यातील विहिरगाव व कोरची येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ ३ सप्टेंबर रोजी करण्यात आला.
देसाईगंज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा विहिरगाव येथील युवक विद्यालयात आयोेजित करण्यात आली आहे. स्पर्धेेचे उद्घाटन संस्था सचिव अब्दुल गणी यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन. के. वैद्य तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका गुरनुले, प्रा. कहूरके, जी. के. पिल्लारे, रमाकांत ठेंगरी, आर. डी. हरणे, एस. आर. दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा ६ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. स्पर्धेत १४ वर्ष, १७ वर्र्ष व १९ वर्ष वयोगटातील कबड्डी, खो- खो, व्हॉलिबॉल तसेच इतर वैयक्तिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तालुका क्रीडा समितीच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा समितीचे उपाध्यक्ष एन. एल. मेश्राम, संचालन पुस्तोडे तर आभार गुरफुले यांनी मानले. स्पर्धेत देसाईगंज तालुक्यातील १८ शाळांमधील संघांनी सहभाग घेतला आहे. यशस्वीतेसाठी शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी व नागरिकांनी सहकार्य केले. याप्रसंगी सेवानिवृत्ती शिक्षक एस. आर. दिवटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कोरची येथील श्रीराम विद्यालयाच्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय क्रीडा समिती कोरचीच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ बुधवारी तहसीलदार बोरूले यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी प्राचार्य गजभिये, नायब तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार हटवार, पित्तूलवार, आनंद चौबे आदी मान्यवर उपस्थित होते. तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत श्रीराम विद्यालय कोरची, पार्वताबाई विद्यालय कोरची, वनश्री विद्यालय कोरची, धनंजय स्मृती विद्यालय बेतकाटी, धनंजय स्मृती विद्यालय देऊळभट्टी, भगवंतराव विद्यालय बोटेकसा, भगवंतराव विद्यालय बोरी, छत्रपती विद्यालय मसेली, अरूणा विद्यालय कोटरा, पितृछाया विद्यालय बोटेकसा, जिल्हा परिषद हायस्कूल बेडगाव, युवा स्पंदन विद्यालय भीमपूर, महात्मा फुले विद्यालय बेलगाव या शाळांच्या संघांनी सहभाग घेतला आहे. प्रास्ताविक क्रीडा सचिव हटवार यांनी मानले. पंच म्हणून करंजकर, गायधने, बावणे, डोंगरवार, बोरकर, कराडे काम पाहत आहेत. विजेत्या संघाचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या स्पर्धेत विजयी झालेल्या संघांना पुढील स्पर्धेत तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Vihargaon and Kourga Taluka level sports competition