ग्रामसेवकांचा आंदोलनाचा इशारा

By Admin | Updated: October 28, 2016 01:04 IST2016-10-28T01:04:16+5:302016-10-28T01:04:16+5:30

विविध मागण्यांसाठी ७ नोव्हेंबरपासून राज्यस्तरीय असहकार करण्यात येणार आहे,

Vigilance of Gramsevak agitation | ग्रामसेवकांचा आंदोलनाचा इशारा

ग्रामसेवकांचा आंदोलनाचा इशारा

निवेदन सादर : ७ नोव्हेंबरपासून असहकार, १७ पासून कामबंद
गडचिरोली : विविध मागण्यांसाठी ७ नोव्हेंबरपासून राज्यस्तरीय असहकार करण्यात येणार आहे, असा इशारा ग्रामसेवक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनकर यांनी स्वीकारले.
ग्रामसेवक संवर्गाच्या १५ समस्या प्रलंबित आहेत. यामध्ये कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्ष सेवाकाल नियमित करावा, २०११ च्या लोकसंख्येनुसार ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्यात यावी, या मागण्यांचा समावेश आहे. या मागण्या सोडविण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा आंदोलन करण्यात आले. मात्र शासनाने दुर्लक्ष केल्याने ७ नोव्हेंबरपासून असहकार आंदोलन, १० नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे, १५ ला विभागीय आयुक्त कार्यालयासमोेर धरणे व १७ नोव्हेंबर रोजी राज्यभर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जि. प. महासंघाचे रतन शेंडे, जिल्हाध्यक्ष कवीश्वर बनपुरकर, नवलाजी घुटके, दामोधर पटले, खुशाल नेवारे, संजीव बोरकर, राठोड उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Vigilance of Gramsevak agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.