विदर्भवाद्यांचे जिल्हाभरात आत्मक्लेष आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST2019-12-25T05:00:00+5:302019-12-25T05:00:38+5:30

विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूरच्या आदेशान्वये कुरखेडा येथे तहसील कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खेडेगाव, हेटीनगर, कुरखेडा, नान्ही, पुराडा परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व रामचंद्र रोकडे, हेमलता भैसारे, मुत्ताजी दुर्गे, ज्ञानचंद सहारे, रमेश मानकर, घिसू खुणे, राजेंद्रसिंह ठाकूर, तुकाराम कवडो, वासुदेव किंचक, बुधराम साहाळा, शरद बन्सोड, किसनलाल साहाळा, दादाजी दरवडे आदी हजर होते.

Vidarbhists' self-immolation movement in district | विदर्भवाद्यांचे जिल्हाभरात आत्मक्लेष आंदोलन

विदर्भवाद्यांचे जिल्हाभरात आत्मक्लेष आंदोलन

ठळक मुद्देस्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी : शेतकऱ्यांचे कृषिपंपाचे वीज बिल माफ करा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/कुरखेडा : स्वतंत्र विदर्भ राज्य स्थापन करावे या मुख्य मागणीसाठी विदर्भवादी नेत्यांनी गडचिरोली, कुरखेडा तसेच इतरही तालुकास्तरावर मंगळवारी आत्मक्लेष आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
विदर्भात मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती आहे. या साधनसंपत्तीच्या बळावर विदर्भ हे आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्य होऊ शकते. महाराष्टÑ शासन विदर्भावर सातत्याने अन्याय करीत आला आहे. विदर्भात विजेची निर्मिती होत असतानाही या ठिकाणी भारनियमन केले जाते. भारनियमन बंद करून शेती पंपाला २४ तास पूर्ण दाबाची वीज द्यावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३० हजार रुपये व फळबागेसाठी ५० हजार रुपये एकरी नुकसानभरपाई द्यावी. संपूर्ण शेतकºयांचे कृषिपंपाचे बिल माफ करावे. तरूणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. शासकीय धान खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी आदी मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जिल्हाभरात मंगळवारी आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. गडचिरोली येथील आंदोलनात जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश उप्पलवार, पंडित पुडके, पांडुरंग घोटेकर, चंद्रशेखर जक्कनवार, दत्तात्रय पाचभाई, नारायण मस्के, प्रमोद टोपरे, सुधाकर डोईजड, एकनाथ नंदेश्वर, कमलाकर वाळके, गुरूदेव भोपये, रमेश भुरसे, देवाजी सोनटक्के, सिद्धार्थ नंदेश्वर, भास्कर कोडापे, तुळशिदास भांडेकर, उद्धव डांगे, गोविंदराव बानबले आदी हजर होते. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व पंतप्रधानांना पाठविण्यात आले. आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो नागरिक सहभागी होऊन स्वतंत्र विदर्भासाठी घोषणा दिल्या.

कुरखेडा व मुलचेरातही आंदोलन
विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूरच्या आदेशान्वये कुरखेडा येथे तहसील कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खेडेगाव, हेटीनगर, कुरखेडा, नान्ही, पुराडा परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व रामचंद्र रोकडे, हेमलता भैसारे, मुत्ताजी दुर्गे, ज्ञानचंद सहारे, रमेश मानकर, घिसू खुणे, राजेंद्रसिंह ठाकूर, तुकाराम कवडो, वासुदेव किंचक, बुधराम साहाळा, शरद बन्सोड, किसनलाल साहाळा, दादाजी दरवडे आदी हजर होते.
मुलचेरातील आंदोलनात बादलचंद्र शाहा, उमेश पेळूकर, नगराध्यक्ष दीपक परचाके, प्राचार्य रणजीत मंडल, गणेश गरघाटे, गणपत मडावी, दिवाकर पेंदाम, गणेश बंकावार, नरेंद्र पेडूकर, प्रफुल दुर्गे, दिलीप आत्राम, सुभाष आत्राम, आकाश तुरनकर, प्रा.विठ्ठल निकुले, गुलशन मालमपल्ली, शुभम शेंडे, मनीष कडते, दादाजी सिडाम, मारोती वेलादी, कृष्णा तरमलवार आदी हजर होते. आंदोलनानंतर मंडळ अधिकाºयांना निवेदन दिले.

Web Title: Vidarbhists' self-immolation movement in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.