घाेट येथे विदर्भवाद्यांचे धरणे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:07 IST2021-02-18T05:07:57+5:302021-02-18T05:07:57+5:30
घोट : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने १५ फेब्रुवारी रोजी घाेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले. घोट येथील बसस्थानक चौकात ...

घाेट येथे विदर्भवाद्यांचे धरणे आंदाेलन
घोट : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने १५ फेब्रुवारी रोजी घाेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले. घोट येथील बसस्थानक चौकात विदर्भ आंदोलन समितीने आंदोलन करताना आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. कोरोना काळातील वीजबिल महाराष्ट्र सरकारने भरावे, २०० युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करून नंतरचे बिल निम्मे करावे, महावितरण कंपनी वीज जोडणी कापत असल्याच्या धाेरणाचा निषेध करतानाच शेतकऱ्यांना शेतीपंपांचे वीजबिलातून मुक्त करावे, कृषिपंपांचे भारनियमन बंद करावे, विदर्भातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसानभरपाई २५ हजार रुपये प्रतिहेक्टर अशी सरसकट द्यावी, घोट तालुक्याची निर्मिती करावी, स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे आदी मागण्यांकडे या आंदोलनातून लक्ष वेधण्यात आले. या आंदाेलनात विदर्भ आंदोलन समितीचे ग्रामीण मध्य जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, विलास गण्यारपवार, नानू उपाध्ये, दिनकर लाकडे, नामदेव कागदेलवार, मधुकर जवादे, ऋषी येनप्रेडीवार, अनिता पोरेड्डीवार, ताराबाई उईके, संगीता वडेट्टीवार, कीर्ती शिंगुरपवार, वंदना गंधेवार, विजयालक्ष्मी चंदनखेडे, रमाबाई येनप्रेडीवार, कमलाबाई पोरेड्डीवार, स्वाती गांडलीवार, समीक्षा रामटेके, सुनीता मेश्राम, मोनिका शहा, संगीता पेंदाम, बेबी देशमुख, पौणिमा शहा, बंडू कुळसंगे व नागरिक सहभागी झाले होते.