शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या विजयाचा जल्लोष

By admin | Updated: October 19, 2014 23:37 IST

गडचिरोली विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळविला आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात डॉ. देवराव होळी हे ७० हजार १८५ मते

गडचिरोली विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळविला आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात डॉ. देवराव होळी हे ७० हजार १८५ मते घेऊन विजयी झाले. अहेरी विधानसभा क्षेत्रात राजे अम्ब्रीशराव सत्यवानराव आत्राम हे ५६ हजार ४१८ मते घेऊन विजयी झाले. तसेच आरमोरी क्षेत्रात क्रिष्णा गजबे हे ६० हजार ४१३ मते घेऊन विजयी झाले. गडचिरोली, देसाईगंज व अहेरी शहरात भाजपच्यावतीने भव्य मिरवणुक काढून या विजयाचा जल्लोष करण्यात आला. भाजपच्या अभूतपूर्व यशामुळे सध्या गडचिरोली जिल्हा भाजपमय झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना जिल्ह्यात माघारली असल्याचे दिसून येते. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार डॉ. देवराव होळी हे पहिल्या फेरीपासून तर अंतिम २४ व्या फेरीपर्यंत सलग आघाडीवर राहीले. त्यांची आघाडी ही मोठ्या मताची होती. त्यामुळे १५ व्या फेरीच्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात जमलेल्या भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी फटाके फोडण्यास सुरूवात झाली. डॉ. देवराव होळी हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर मत मोजणीच्या ठिकाणावरून मुल मार्गाने भाजपच्यावतीने विजयीरथ बनवून मिरवणुक काढण्यात आली. सदर विजयी रॅली आठवडी बाजार परिसरातून मुख्य मार्गाने भाजपाच्या प्रचार कार्यालयात पोहोचली. या रॅलीत विजयी उमेदवार डॉ. देवराव होळी यांच्या समवेत खासदार अशोक नेते, रविंद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, स्वप्नील वरगंटीवार, सुधाकर येनगंधलवार, गजानन येनगंधलवार, रेखा डोळस, डेडूजी राऊत आदींसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. अहेरी शहरात राजे अम्ब्रीशराव सत्यवानराव आत्राम यांच्या विजयाचा जल्लोष मुख्य मार्गाने रॅली काढून करण्यात आला. तसेच देसाईगंज शहरात क्रिष्णा गजबे यांची विजयी मिरवणूक मुख्य मार्गाने काढण्यात आली. या दोनही रॅलीत आरमोरी व अहेरी क्षेत्रातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)