शारीरिक शोषण करणाऱ्या प्रियकराला अटक

By Admin | Updated: May 23, 2016 01:28 IST2016-05-23T01:28:56+5:302016-05-23T01:28:56+5:30

प्रेमसंबंधातून गर्भधारणा झाल्याने प्रियेसी युवतीने बाळाला जन्म दिला. मात्र प्रियकर युवकाने प्रियेसी व जन्मलेल्या बाळाचा स्वीकार न केल्याने अखेर निराश होऊन ....

A victim of physical abuse was arrested | शारीरिक शोषण करणाऱ्या प्रियकराला अटक

शारीरिक शोषण करणाऱ्या प्रियकराला अटक

पोलिसांत तक्रार : युवतीने बाळाला दिला जन्म
कुरखेडा : प्रेमसंबंधातून गर्भधारणा झाल्याने प्रियेसी युवतीने बाळाला जन्म दिला. मात्र प्रियकर युवकाने प्रियेसी व जन्मलेल्या बाळाचा स्वीकार न केल्याने अखेर निराश होऊन प्रियेसी युवतीने कुरखेडा पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकर युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला व रात्री उशीरा आरोपीला पोलिसांनी अटक केली.
नरेंद्र तानू हिचामी (२३) रा. चव्हेला असे अटक करण्यात आलेल्या प्रियकर आरोपीचे नाव आहे. नरेंद्र हिचामी याचे त्याच्या भावाच्या साळीसोबत प्रेमसंबंध जुळले. या संबंधातून प्रियेसी युवतीला गतवर्षी गर्भधारणा झाली. त्यामुळे तिने प्रियकर नरेंद्र याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. त्याने गावातून पळ काढला. दरम्यान २३ आॅक्टोबर २०१५ रोजी प्रियेसी युवतीने बाळाला जन्म दिला. मात्र यावेळीही नरेंद्र गावातून पसार होता. तो गावात परत आल्याची कुणकुण लागताच प्रियेसी युवतीने त्याचे घर गाठले. नरेंद्रला आपला व बाळाचा स्वीकार करण्याची गळ घातली. मात्र नरेंद्रने तिला स्पष्ट शब्दात नकार दिला. अखेर प्रियेसी युवतीने रविवारी सायंकाळी ६ वाजता कुरखेडा पोलीस ठाणे गाठून नरेंद्रच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नरेंद्रच्या विरोधात भादंविचे कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: A victim of physical abuse was arrested