पीडित कसारे कुटुंबाला न्याय मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST2021-07-24T04:21:51+5:302021-07-24T04:21:51+5:30

या घटनेसंदर्भात कुरखेडा पोलीस स्टेशन येथून माहिती घेण्यात आलेली आहे. तपास प्रगतिपथावर असून लवकरच प्रकरणाचा उलगडा करण्यात येईल, अशी ...

The victim Kasare will bring justice to the family | पीडित कसारे कुटुंबाला न्याय मिळवून देणार

पीडित कसारे कुटुंबाला न्याय मिळवून देणार

या घटनेसंदर्भात कुरखेडा पोलीस स्टेशन येथून माहिती घेण्यात आलेली आहे. तपास प्रगतिपथावर असून लवकरच प्रकरणाचा उलगडा करण्यात येईल, अशी माहिती येथील तपास अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे समाजबांधवांनी विश्वास व संयम ठेवावा, असे आवाहन यावेळी आमदार गजबे यांनी केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, विलास गावंडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजपा अल्पसंख्यक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, माजी पंचायत समिती सदस्य गणपत सोनकुसरे, माजी नगरसेवक ॲड. उमेश वालदे, माजी सरपंच महादेव पुंगळे तसेच बौद्ध समाजाचे नेते नारायण टेंभूर्णे, महेंद्रकुमार माने, मुक्ताजी दुर्गे व बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते.

230721\img20210723120734.jpg

बौद्ध समाजाला मार्गदर्शन करताना आमदार गजभे

Web Title: The victim Kasare will bring justice to the family