पशुवैद्यकीय सेवा पूर्णत: काेलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:36 IST2021-03-16T04:36:12+5:302021-03-16T04:36:12+5:30
एटापल्ली : येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली असून, ही इमारत आता जीर्णावस्थेत आली आहे. रिक्त पदांमुळे येथील ...

पशुवैद्यकीय सेवा पूर्णत: काेलमडली
एटापल्ली : येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली असून, ही इमारत आता जीर्णावस्थेत आली आहे. रिक्त पदांमुळे येथील पशुवैद्यकीय सेवा काेलमडली असून, विद्युत देयक थकीत असल्याने या दवाखान्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. राष्ट्रीय समविकास याेजनेंतर्गत सन २००३-०४ या वर्षात ८३ हजार ७२७ रुपये खर्च करून या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, सद्य:स्थितीत ही इमारत जीर्णावस्थेत आहे. या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी पशुपालकांकडून हाेत आहे.
तालुक्यातील पशुसंवर्धन विभागात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवा काेलमडली आहे. विद्युत देयक अदा न केल्याने महावितरणने या दवाखान्याच्या इमारतीतील वीज कापली आहे. दीड वर्ष उलटूनही येथे वीज पुरवठा हाेत नसल्याने येथील सर्व फ्रीज खराब झाले आहेत. परिणामी जनावरांची शासकीय औषधी खराब हाेत आहे. शासन, प्रशासन व संबंधित विभागाचे या दवाखान्याच्या सुविधांकडे दुर्लक्ष हाेत आहे.