शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पुढले एकदोन आठवडे अत्याधिक महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 15:28 IST

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाने उचलेली पावले अत्यंत आवश्यक असून नागरिकांनी त्याला १०० टक्के साथ द्यावी असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाने उचलेली पावले अत्यंत आवश्यक असून नागरिकांनी त्याला १०० टक्के साथ द्यावी असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले आहे.ते पुढे म्हणतात, आत्ताची लढाई ही जगण्यामरण्याचीच आहे. अद्याप ग्रामीण भागात ही साथ पोहचलेली नाही. केवळ त्याविषयीची थोडीफार माहिती व भीती पोहचली आहे. जर ग्रामीण भागात ही साथ आली तर भयंकर स्थिती निर्माण होईल. आपल्याला ते घडण्यापासून रोखायचे आहे.आतापर्यंत राज्यात याच्या १५० केसेस झाल्या आहेत. म्हणजे दर आठवड्याला हा आकडा दुप्पट होतो आहे. यासंदर्भात मिडिया व सोशल मिडियावरून माहिती देणे सुरू आहे. शासनही आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करीत आहे. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. नागरिकांनी त्यांना दिलेल्या सूचना तंतोतंत पाळाव्यात व जी काळजी घ्यावयास सांगितली जाते आहे ती घ्यावी.१९१७ साली स्पॅनिश फ्लूची साथ पसरली होती. तीत किमान ५ कोटी लोक बळी पडले होते. त्या तुलनेत कोरोनाचा प्रसार सध्यातरी भारतात कमी आहे. मात्र तो केव्हाही वाढून आटोक्याबाहेर जाऊ शकतो. माझे सर्वांना आवाहन आहे की, कोरोनाला पसरण्यापासून रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAbhay Bangअभय बंग