तालुक्याबाहेरील विक्रेत्यांना आता धानोराच्या बाजारात मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:01:02+5:30
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तालुक्यातील विक्रेत्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच मास्क शिवाय फिरू नये. अन्यथा दंड आकारण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला. देशभर कोरोना विषाणूचे संकट वाढतच चालले आहे. धोका अधिक असलेल्या ठिकाणी सरकारने लाकडाऊन केले असून जिल्हाबंदी लागू केली आहे.

तालुक्याबाहेरील विक्रेत्यांना आता धानोराच्या बाजारात मनाई
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : धानोरा येथे बाजार भरत असून तालुकाबाहेरील विक्रेत्यांनी येथे येऊन अनावश्यक गर्दी टाळावी. अशा सूचना धानोरा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांनी विक्रेत्यांना दिल्या आहेत.
१७ जुलै रोजी मुख्याधिकारी बेंबरे यांनी धानोरा येथील भाजीबाजार व इतर मार्केटला भेट देऊन पाहणी केली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तालुक्यातील विक्रेत्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच मास्क शिवाय फिरू नये. अन्यथा दंड आकारण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला. देशभर कोरोना विषाणूचे संकट वाढतच चालले आहे. धोका अधिक असलेल्या ठिकाणी सरकारने लाकडाऊन केले असून जिल्हाबंदी लागू केली आहे. सरकारने अनेक निर्बंध लावूनही काही नागरिक नियमाचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. धानोरा येथेही असाच प्रकार सुरू असल्याचे दिसून आले. धानोरा येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरत होता. परंतु कोरोनामुळे लाकडाऊन झाल्यापासून सदर बाजार बंद करण्यात आला. येथील मुख्य मार्गावर दैनंदिन गुजरी भरवली जाते. जेणेकरून नागरिकांना भाजीपाला, फळ या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हावे परंतु या गुजरीमध्ये दर शुक्रवारी बाहेरील तालुक्यातील विक्रेते येऊन आपले दुकान लावत आहेत. आवश्यक वस्तू व्यतिरिक्त इतरही विक्रेते आपले दुकान लावत होते. त्यामुळे मुख्य मार्गावर अनावश्यक गर्दी वाढत चालली होती हा मुख्य मार्ग असल्याने गर्दीमुळे अपघाताचा धोका होण्याची शक्यता वाढत चालली होती. तसेच अनेक नागरिक व दुकानदार विना मास्क फिरताना दिसत होते व फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे १७ जुलै रोजी न.पं.चे मुख्याधिकारी बेंबरे व पोलिस कर्मचाºयांनी शहरात फिरून तालुकाबाहेरील विक्रेत्यांना आवश्यकत्या सूचना केल्या. धानोरा तालुक्याच्या बाहेरील विक्रेत्यांनी आपले दुकान धानोरा येथे लावू नये, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी न.पं.चे कर्मचारी गुलाब ठाकरे, उमेश नागपुरे, मुरलीधर बोगा व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.