शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
4
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
5
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
6
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
7
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
8
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
9
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
10
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
11
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
12
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
13
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
14
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
15
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
16
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
17
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
18
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
19
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
20
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी

अरूंद रस्त्यावर फसतात वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST

मानापुरातून पिसेवडधाकडे जाणारा अंतर्गत रस्ता अनेक वर्षांपासून रूंद होता. या रस्त्याने बैलगाड्या, ट्रक, ट्रॅक्टर व इतर वाहने सहज जात होते. परंतु कालांतराने गावकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने रस्ता फारच अरूंद झाला. त्यामुळे येथून चारचाकी वाहने व विरूद्ध दिशेने दुचाकी वाहन आल्यास रस्ता ओलांडता येत नाही. याचा प्रयत्य वेळोवेळी येत आहे.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता : मानापूर-पिसेवडधा मार्गाच्या रूंदीकरणाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : मानापूर ते पिसेवडधा मार्ग अतिशय अरूंद आहे. या मार्गावरून दुचाकी व चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचे आवागमन असते. मानापूर येथील रस्ता आधीच अरूंद असताना दररोजच्या वाढत्या रहदारीमुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. चार दिवसांपूर्वी मानापूर येथे श्रीराम मंदिरापासून पिसेवडधाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवजड ट्रक फसला. त्यामुळे या मार्गाचे रूंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.मानापुरातून पिसेवडधाकडे जाणारा अंतर्गत रस्ता अनेक वर्षांपासून रूंद होता. या रस्त्याने बैलगाड्या, ट्रक, ट्रॅक्टर व इतर वाहने सहज जात होते. परंतु कालांतराने गावकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने रस्ता फारच अरूंद झाला. त्यामुळे येथून चारचाकी वाहने व विरूद्ध दिशेने दुचाकी वाहन आल्यास रस्ता ओलांडता येत नाही. याचा प्रयत्य वेळोवेळी येत आहे. या ठिकाणी तीन ते चार अपघात आजपर्यंत घडले. परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही. एका ट्रॅक्टरने तीन वेळा संरक्षक भिंतीचे नुकसान केले तर एका ट्रॅक्टरने कुंपणच उधळून लावले होते. एकदा तर जीवंत विद्युत तारांचे खांब देलनवाडी गावापर्यंत फरफटत नेले होते. या ठिकाणावरून एसटी महामंडळाची बस रांगी-गडचिरोली मार्गे निघू शकते. परंतु केवळ मानापुरातील अंतर्गत अरूंद रस्त्यामुळे थेट कुरखेडा ते गडचिरोली मार्गे नेली जाते. कमी लांबीचा मार्ग असतानाही या मार्गे बस सुरू केली जात नाही. यासाठी दोन ते तीन वेळा एसटी महामंडळाने बस पाठवून तपासणी केली होती. परंतु अरूंद रस्त्यामुळे बस येण्यासही अडचणी आहेत. त्यामुळे गावातील अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्त्याची रूंदी वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.वाहनांमुळे नालीचे नुकसानमानापूर येथील अरूंद रस्त्यांमुळे अवजड वाहने रस्त्याच्या बाजूला नालीलगत फसतात. त्यामुळे येथील नाली खचते. चार दिवसांपूर्वी दिवाकर मोरघडे यांच्यास घराजवळ दुचाकीला रस्ता देत असताना मोठा ट्रक नालीजवळ फसला. यापूर्वीसुद्धा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नालीचे नुकसान होत आहे. त्यामुळे गावातील अरूंद रस्त्याचे रूंदीकरण करण्याची मागणी आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा