अरूंद रस्त्यावर फसतात वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST2020-09-22T05:00:00+5:302020-09-22T05:00:22+5:30

मानापुरातून पिसेवडधाकडे जाणारा अंतर्गत रस्ता अनेक वर्षांपासून रूंद होता. या रस्त्याने बैलगाड्या, ट्रक, ट्रॅक्टर व इतर वाहने सहज जात होते. परंतु कालांतराने गावकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने रस्ता फारच अरूंद झाला. त्यामुळे येथून चारचाकी वाहने व विरूद्ध दिशेने दुचाकी वाहन आल्यास रस्ता ओलांडता येत नाही. याचा प्रयत्य वेळोवेळी येत आहे.

Vehicles get stuck on narrow roads | अरूंद रस्त्यावर फसतात वाहने

अरूंद रस्त्यावर फसतात वाहने

ठळक मुद्देअपघाताची शक्यता : मानापूर-पिसेवडधा मार्गाच्या रूंदीकरणाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मानापूर/देलनवाडी : मानापूर ते पिसेवडधा मार्ग अतिशय अरूंद आहे. या मार्गावरून दुचाकी व चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचे आवागमन असते. मानापूर येथील रस्ता आधीच अरूंद असताना दररोजच्या वाढत्या रहदारीमुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. चार दिवसांपूर्वी मानापूर येथे श्रीराम मंदिरापासून पिसेवडधाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवजड ट्रक फसला. त्यामुळे या मार्गाचे रूंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मानापुरातून पिसेवडधाकडे जाणारा अंतर्गत रस्ता अनेक वर्षांपासून रूंद होता. या रस्त्याने बैलगाड्या, ट्रक, ट्रॅक्टर व इतर वाहने सहज जात होते. परंतु कालांतराने गावकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने रस्ता फारच अरूंद झाला. त्यामुळे येथून चारचाकी वाहने व विरूद्ध दिशेने दुचाकी वाहन आल्यास रस्ता ओलांडता येत नाही. याचा प्रयत्य वेळोवेळी येत आहे. या ठिकाणी तीन ते चार अपघात आजपर्यंत घडले. परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही. एका ट्रॅक्टरने तीन वेळा संरक्षक भिंतीचे नुकसान केले तर एका ट्रॅक्टरने कुंपणच उधळून लावले होते. एकदा तर जीवंत विद्युत तारांचे खांब देलनवाडी गावापर्यंत फरफटत नेले होते. या ठिकाणावरून एसटी महामंडळाची बस रांगी-गडचिरोली मार्गे निघू शकते. परंतु केवळ मानापुरातील अंतर्गत अरूंद रस्त्यामुळे थेट कुरखेडा ते गडचिरोली मार्गे नेली जाते. कमी लांबीचा मार्ग असतानाही या मार्गे बस सुरू केली जात नाही. यासाठी दोन ते तीन वेळा एसटी महामंडळाने बस पाठवून तपासणी केली होती. परंतु अरूंद रस्त्यामुळे बस येण्यासही अडचणी आहेत. त्यामुळे गावातील अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्त्याची रूंदी वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वाहनांमुळे नालीचे नुकसान
मानापूर येथील अरूंद रस्त्यांमुळे अवजड वाहने रस्त्याच्या बाजूला नालीलगत फसतात. त्यामुळे येथील नाली खचते. चार दिवसांपूर्वी दिवाकर मोरघडे यांच्यास घराजवळ दुचाकीला रस्ता देत असताना मोठा ट्रक नालीजवळ फसला. यापूर्वीसुद्धा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नालीचे नुकसान होत आहे. त्यामुळे गावातील अरूंद रस्त्याचे रूंदीकरण करण्याची मागणी आहे.

Web Title: Vehicles get stuck on narrow roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.