जेजाणी मिलमध्ये नऊ हजार क्विंटल तांदळाची तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 11:06 PM2022-10-22T23:06:12+5:302022-10-22T23:11:38+5:30

जेजाणी राईस मिलच्या रेकार्डची तपासणी केली असता, टीडीसी अहेरी, गडचिरोली व डीएमओ गडचिरोली यांचेकडून प्राप्त आरओनुसार या मिलमध्ये एकूण २३ हजार ६४५ क्विंटल एवढे धान प्राप्त झाले. ६७ टक्के प्रमाणे १५ हजार ८४२ क्विंटल तांदुळ भरडाई करून उपलब्ध करून द्यावयाचे होते. त्यापैकी शासकीय गोदामात सीएमआर तांदूळ ५ हजार ६९ क्विंटल जमा केल्याचे दिसून आले.

Variation of nine thousand quintals of rice in Jejani Mill | जेजाणी मिलमध्ये नऊ हजार क्विंटल तांदळाची तफावत

जेजाणी मिलमध्ये नऊ हजार क्विंटल तांदळाची तफावत

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : देसाईगंज येथील जेजाणी राईस मिलची देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी जे. पी. लाेंढे यांनी १७ ऑक्टाेबरला तपासणी केली असता या राईस मिलमध्ये सुमारे ८ हजार ८०७ क्विंटल तांदूळ कमी प्रमाणात आढळून आला आहे तसा जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. 
जिल्हाधिकारीऱ्यांच्या निर्देशानुसार देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी जे. पी. लाेंढे यांनी १७ ऑक्टाेबरला प्रत्यक्ष राईस मिलमध्ये जाऊन तपासणी केली. यावेळी देसाईगंजचे तहसीलदार संताेष महाले, खरेदी अधिकारी गजानन काेकडे, निरीक्षण अधिकारी अप्पासाहेब पाटील, अविनाश माेरे, सचिन रामटेके उपस्थित हाेते तसेच जेजाणी राईसमिलच्यावतीने संजय जेजाणी, शैलेंद्र रामटेके उपस्थित हाेते. 
जेजाणी राईस मिलच्या रेकार्डची तपासणी केली असता, टीडीसी अहेरी, गडचिरोली व डीएमओ गडचिरोली यांचेकडून प्राप्त आरओनुसार या मिलमध्ये एकूण २३ हजार ६४५ क्विंटल एवढे धान प्राप्त झाले. ६७ टक्के प्रमाणे १५ हजार ८४२ क्विंटल तांदुळ भरडाई करून उपलब्ध करून द्यावयाचे होते. त्यापैकी शासकीय गोदामात सीएमआर तांदूळ ५ हजार ६९ क्विंटल जमा केल्याचे दिसून आले. १० हजार ७४६  क्विंटल तांदूळ सदरहू राईस मिलधारकाकडून शासनास येणेबाकी आहे. तथापि तपासणीच्यावेळी जेजाणी राईस मिलमध्ये ५० किलो वजनाचे तांदळाचे १ हजार ८२४ पोती आढळली. त्यांचे वजन ९१२ क्विंटल होते. तपासणीवेळी ३ हजार ८२० धानाची पोती आढळली. ४० किलो प्रती गोणीनुसार १ हजार ५३२ क्विंटल धानापासून ६७ टक्केनुसार १ हजार २६ क्विंटल इतकाच तांदूळ तयार होऊ शकतो. त्यामुळे सदर राईस मिलमध्ये ८ हजार ८०८ क्विंटल तांदळाची तफावत आहे.

देवीकमल राईस मिलमध्येही तांदूळ कमी 
-    टीडीसी अहेरी व डीएमओ गडचिरोली यांच्याकडून प्राप्त आरओनुसार देविकमल राईस इंडस्ट्रीजला एकूण ३ हजार ८८ क्विंटल एवढे धान प्राप्त झाले. ६७ टक्क्यांप्रमाणे २ हजार ६९ क्विंटल तांदूळ भरडाई करून उपलब्ध करून द्यावयाचे होते. त्यापैकी शासकीय गोदामात १ हजार ३४३ क्विंटल सीएमआर तांदूळ जमा केल्याचे दिसून आले. 
-    ७२५ क्विंटल तांदूळ सदरहू राईस मिलधारकाकडून शासनास येणे बाकी आहे. तथापि तपासणीच्यावेळी मिलमध्ये ५० किलो याप्रमाणे तांदळाचे ६७२ पोते आढळून आले. त्यांचे वजन ३३६  क्विंटल होते. 
-    तपासणी वेळी ३५० धानाची पोती आढळून आली. ४० किलो प्रती गोणीनुसार १४० क्विंटल धानापासून  ९३.८० क्विंटल इतकाच तांदूळ तयार होऊ शकतो. त्यामुळे सदर राइस मिलमध्ये ३९५.८२ क्विंटल तांदळाची तफावत दिसून येते.

 

Web Title: Variation of nine thousand quintals of rice in Jejani Mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.