जामगाव येथे बांधला वनराई बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST2021-02-05T08:53:24+5:302021-02-05T08:53:24+5:30

गडचिराेली : ‘स्वच्छ गाव हरित गाव’ अभियानांतर्गत नेहरू युवा केंद्र गडचिरोली संलग्नित जय सेवा युवा मंडळ जामगावच्या वतीने गावालगत ...

Vanrai dam built at Jamgaon | जामगाव येथे बांधला वनराई बंधारा

जामगाव येथे बांधला वनराई बंधारा

गडचिराेली : ‘स्वच्छ गाव हरित गाव’ अभियानांतर्गत नेहरू युवा केंद्र गडचिरोली संलग्नित जय सेवा युवा मंडळ जामगावच्या वतीने गावालगत श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. नाल्यातील पाणी वाहून न जाता अधिकाधिक पाणी जमिनीत मुरावे यासाठी वनराई बंधारा बांधण्यात आला. या वेळी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक विनोद मडावी, तसेच जय सेवा युवा मंडळाचे अध्यक्ष दिवाकर धुर्वा, सदस्य अशोक कुमरे, महेश कुमरे, ग्रामपंचायत सदस्य मारोती हिचामी, देविदास मडावी, वच्छला नरोटे, जयश्री नरोटे, जयवंता नरोटे, अंगणवाडी सेविका लता गावळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष लक्ष्मण कोरामी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदराव गावळे, संगणक परिचालक राजकुमार मडावी, रुनिता पोटावी, अश्मिता मडावी, सुमित्रा नरोटे, अनिल कोराम, खुशाल कुमरे, संदीप कोरम, विनोद पोटावी, राजेश नरोटे, देवनाथ धुर्वे, बाबूराव पोटावी, राकेश गावंडे, वासुदेव गावंडे, हर्षद मडावी, दिवाकर मडावी, नीलेश नरोटे, सचिन गावळे उपस्थित हाेते.

Web Title: Vanrai dam built at Jamgaon