वैशाख वणवा धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:13 IST2018-04-27T00:13:03+5:302018-04-27T00:13:03+5:30

एप्रिल महिन्यात अक्षयतृतीयापासून वैैशाख या मराठी महिन्याची सुरूवात होते. या महिन्यात जर जंगलांना आगी लागल्या तर त्याचे वाईट परिणाम होतात. वन व वन्य जीवांची प्रचंड हानी होते. त्यामुळे वैैशाख वनवा धोकादायक आहे.

Vaishakh is dangerous | वैशाख वणवा धोकादायक

वैशाख वणवा धोकादायक

ठळक मुद्देवन व वन्यजीवांची हानी : वन व्यवस्थापन समित्यांचे सहकार्य नाममात्र

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : एप्रिल महिन्यात अक्षयतृतीयापासून वैैशाख या मराठी महिन्याची सुरूवात होते. या महिन्यात जर जंगलांना आगी लागल्या तर त्याचे वाईट परिणाम होतात. वन व वन्य जीवांची प्रचंड हानी होते. त्यामुळे वैैशाख वनवा धोकादायक आहे.
पानझडीच्या वणव्यांना मार्च महिन्यापासूनच विविध कारणांनी आगी लागतात. परंतु फेब्रुवारी, मार्च महिन्यात जंगलांना लागणाऱ्या वनव्यांची तीव्रता कमी असते. आग नियंत्रणात आणता येते. परंतु एप्रिल महिन्याच्या शेवट आणि मे महिन्याच्या प्रारंभी लागणाºया वणव्याची तीव्रता प्रचंड असते. या वैैशाख महिन्यात जर जंगलांना आगी लागल्या तर वणव्यावर नियंत्रण मिळविताच येत नाही. शिवाय जंगलाला नवीन पालवी येण्याच्या या काळात हिरवे जंगल पुन्हा काळवंडून जाते. जंगलांना लागणाºया आगींवर नियंत्रण करण्यासाठी वन विभागाला सहकार्य करणे, अवैैध जंगलतोड थांबविणे यासारख्या कामात सहकार्य करण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना केली असताना संयुक्त वन व्यवस्थापन समित्या केवळ आर्थिक देवाणघेवाणीच्या कामात अधिक लक्ष घालतात. जनहिताच्या किंवा वन संवर्धनाच्या कामात सहकार्य करीत नाहीत, असा अनुभव सार्वत्रिक आहे. त्यामुळे वैैशाख महिन्यात वणवे लागू नयेत म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते.

मोहफूल हंगामानंतर वणवे लागण्याच्या प्रमाणात वाढ होते. मार्च, एप्रिल महिन्यात वणव्यांची तीव्रता अधिक असते. या कालावधीत वणवे विझविणे मोठे आव्हान असते. वैैशाख महिन्यात लागलेले वणवे धोकादायक असल्याने या महिन्यात वनवे लागू नयेत म्हणून नागरिकांनीही वन विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
- बी. एन. बारसागडे, वन परिक्षेत्र अधिकारी, आरमोरी

Web Title: Vaishakh is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग