पर्यटनस्थळ म्हणून वघाळा उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:09 IST2017-08-30T23:09:15+5:302017-08-30T23:09:42+5:30

तालुक्यातील वघाळा (जुना) येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षी वास्तव्याने येतात. दरवर्षी पक्ष्यांचा ओघ या गावाकडे वळत आहे.

Vaghela neglected as tourist destination | पर्यटनस्थळ म्हणून वघाळा उपेक्षित

पर्यटनस्थळ म्हणून वघाळा उपेक्षित

ठळक मुद्देस्थलांतरित पक्ष्यांचे गाव : पक्षीप्रेमी व नागरिकांची पाहण्यासाठी नेहमी राहते गर्दी

महेंद्र रामटेके।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील वघाळा (जुना) येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षी वास्तव्याने येतात. दरवर्षी पक्ष्यांचा ओघ या गावाकडे वळत आहे. गावातील चिंचेच्या झाडावार घरटी बांधून, अंडी घालून पिल्यांना जन्मसुद्धा वघाळा येथेच देतात. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. स्थलांतरित पक्षी आणि वघाळावासीयांचे नाते अतुट असल्याने पक्ष्यांची व त्यांच्या पिलांची जोपासना वघाळावासी तसेच वन्यजीव पक्षी संरक्षण समितीच्या वतीने सुरू आहे. विदर्भात सर्वात जास्त स्थलांतरित पक्षी वघाळा येथे वास्तव्याने राहत असल्याने ‘स्थलांतरित पक्षाचे गाव, अशी ओळख वघाळाची सर्वत्र निर्माण झाली आहे. दरम्यान स्थलांतरित पक्षांना पाहण्यासाठी पक्षीप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र स्थलांतरित पक्षाचे गाव वघाळा आजही पक्षी पर्यटनस्थळ म्हणून उपेक्षितच आहे.
आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीतिरावर वघाळा (जुना) हे गाव वसलेले आहे. गावात मोठ्या प्रमाणात असलेली चिंचेचे महाकाय वृक्ष, नदी किनारा, शेत व मुबलक पाणी यामुळे सदर गावाला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम ५६३ च्या आसपास आहे. वघाळा येथील नागरिकांचे पक्षी प्रेम, नदी किनाºयामुळे मिळणारे मुक्त वातावरण, पाणी व चाºयाच्या मुबलकतेमुळे दरवर्षी पक्ष्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
यावर्षी सुद्धा स्थलांतरित पक्ष्यांनी पिलांना जन्म दिल्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पक्ष्याच्या थव्यांनी गावातील चिंचेचे झाड वेढलेले आहे. विविध जातीचे पक्षी गुण्यागोविंदाने झाडावर एकत्र राहतात. पक्ष्यांचा किलबिलाट व गोड आवाज गावात नेहमी गुंजत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्थलांतरित पक्षी शेकडो किमीचा प्रवास करून वास्तव्याने वघाळा येथे येत असल्याची परंपरा आहे. वन्यजीव पक्षी संरक्षण समिती व वघाळावासीय नित्यनेमाने पक्ष्यांची जोपासना व संरक्षण करीत आहेत. पक्ष्यांचे माहेर व जन्मस्थळ असलेल्या तसेच नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या वघाळा (जुना) गावात आवश्यक सोयीसुविधा नसल्यामुळे पक्षी पर्यटनाच्या दृष्टीने या गावाचा विकास झाला नाही. वघाळाला पक्षी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून घोषित करून गाव विकासाला चालना द्यावी, अशी मागणी वन्यजीव पक्षी संरक्षण समिती व गावकºयांमार्फत गेल्या वर्षांपासून होत आहे.
याबाबत ठराव घेऊन पाठपुरावाही करण्यात आला. मात्र सदर मागणीकडे शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

चिंचेची ४७ झाडे
दरवर्षी एप्रिल ते मे महिन्यात ओपन ििबल स्टार्क, ब्लॅक कारमोरंट, व्हाईट आयबिस, पेन्डेड स्टॉर्क कॅटल इग्रेट, करकोटा आदींसह विविध जातीचे पक्षी वघाळा येथे मुक्कामे येतात. या गावात चिंचेची ४७ झाडे आहेत. या झाडांवर पक्षी नदीतील चिल्ला आणून घरटी बांधतात.

पक्षी वनोद्यान उभारा
वघाळा गावाला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, घरकूल योजना राबविण्यात यावी तसेच वघाळा येथे पक्षी वनोद्यानाचे काम करण्यात यावे, अशी मागणी वन्यजीव पक्षी संरक्षण समितीचे अध्यक्ष रामदास दोनाडकर, रामकृष्ण धोटे, धनराज दोनाडकर, कार्तिक मेश्राम, संदीप प्रधान आदींनी केली आहे.

Web Title: Vaghela neglected as tourist destination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.