‘त्या’ प्रकरणाच्या निषेधार्थ दाेन दिवस लसीकरण बंद ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST2021-09-21T04:40:58+5:302021-09-21T04:40:58+5:30
जिल्हा परिषद नर्सेस संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील पांढुर्ली प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत पास्ते गावात कोविड लसीकरणदरम्यान आरोग्य ...

‘त्या’ प्रकरणाच्या निषेधार्थ दाेन दिवस लसीकरण बंद ठेवणार
जिल्हा परिषद नर्सेस संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील पांढुर्ली प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत पास्ते गावात कोविड लसीकरणदरम्यान आरोग्य कर्मचारी सूर्यवंशी यांना मारहाण, तसेच आरोग्य सेविकांना गावगुंडांकडून धक्काबुक्की करण्यात आली. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना मोठी शिक्षा होणे गरजेचे आहे. जोपर्यंत त्यांना शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, कोरोना प्रतिबंधक कायदा लागू करून अटक होत नाही. पोलीस संरक्षण लसीकरण करताना मिळणार नाही, तोपर्यंत कोविड लसीकरण बंद राहणार, असा इशारा देण्यात आला. निवेदन देताना जि.प. आराेग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र खरवडे, नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्ष माया सिरसाट, उपाध्यक्ष मंगला चंदनखेडे, प्रभारी अध्यक्ष नीलू वानखेडे, सचिव ज्योती काबरे उपस्थित हाेते.
200921\20gad_3_20092021_30.jpg
अधिकाऱ्यांना निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी.