28 हजार नागरिकांना लसीकरणाने बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST2021-03-28T05:00:00+5:302021-03-28T05:00:24+5:30
देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. शासनाकडून गडचिराेली जिल्ह्याला पुरेसा लसीचा पुरवठा केला जात आहे; मात्र सुरुवातीचे काही दिवस लसीविषयी गैरसमज असल्याने नागरिक तसेच कर्मचारी सुद्धा लस देण्यास कचरत हाेते; मात्र लसीचे काेणतेही दुष्परिणाम नसल्याची खात्री झाल्यानंतर लस घेणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला आराेग्य कर्मचारी व फ्रन्ट लाईन वर्कर यांनाच लस दिली जात हाेती.

28 हजार नागरिकांना लसीकरणाने बळ
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाची लस घेण्यासाठी नागरिक व कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने काेराेना लसीकरणाची गती वाढली आहे. २६ मार्चपर्यंत जिल्हाभरातील २८ हजार ४५ नागरिकांना काेराेनाची लस देण्यात आली आहे.
देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. शासनाकडून गडचिराेली जिल्ह्याला पुरेसा लसीचा पुरवठा केला जात आहे; मात्र सुरुवातीचे काही दिवस लसीविषयी गैरसमज असल्याने नागरिक तसेच कर्मचारी सुद्धा लस देण्यास कचरत हाेते; मात्र लसीचे काेणतेही दुष्परिणाम नसल्याची खात्री झाल्यानंतर लस घेणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला आराेग्य कर्मचारी व फ्रन्ट लाईन वर्कर यांनाच लस दिली जात हाेती. त्यानंतर १ मार्चपासून ४५ वर्षे व ६० वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस दिली जात आहे. नागरिक स्वत: रुग्णालयात जाऊन लस घेत आहेत. त्यामुळे लसीकरणाची गती वाढत आहे.
६४ केंद्रांवर लसीकरण
४५ वर्षे व ६० वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्याचे निर्देश शासनाने दिल्याने लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढली. त्यामुळे आराेग्य विभागामार्फत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविली आहे. सध्या ६४ केंद्रांवर लस दिली जात आहे. काही केंद्र प्राथमिक आराेग्य केंद्रात आहेत. हे केंद्र साेमवार, बुधवार व गुरुवारी सुरू राहतात. इतर दिवशी मात्र बंद राहतात. ग्रामीण रुग्णालयस्तरावरील लसीकरण केंद्र साेमवार ते शनिवारपर्यंत सुरू राहतात.
२३ हजार लससाठा उपलब्ध
गडचिराेली जिल्ह्याला सुरुवातीपासूनच पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे लसीकरणाचे काम सातत्याने सुरू आहे. २८ हजार ४५ नागरिकांना पहिला डाेस तर ८ हजार ४६३ नागरिकांना काेराेना लसीचा दुसरा डाेस देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात २३ हजार लस शिल्लक आहेत. किमान १५ ते २० दिवस लस पुरणार आहेत. ताेपर्यंत पुन्हा शासनाकडून लस पाठविल्या जातील, अशी माहिती आराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. नियाेजनबद्ध पद्धतीने आराेग्य विभागाार्फत लसीकरणाची माेहीम राबविली जात आहे.
दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जागृतीची गरज
प्रामुख्याने शहरी भागातील नागरिक व शहराच्या जवळपास असलेल्या गावांमधील नागरिक लस घेत आहेत. मात्र दुर्गम भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक आराेग्य केंद्रस्तरावर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असले तरी दुर्गम भागातील नागरिक लसीकरणासाठी येत नसल्याचे दिसून येत आहे. सामूहिक राेगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी या नागरिकांचे सुद्धा लसीकरण हाेणे आवश्यक आहे. त्याद्ष्टीने नागरिकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे.