मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यात काेणताही अडथळा असू नये. प्रत्येक जण वर्क फ्राॅम हाेम करू शकत नाही. तरुण मुली व महिला कामानिमित्त घराबाहेर पडतात. अत्यावश्यक सेवेेत अनेक महिला काम करीत आहेत. त्यामुळे त्यांची मासिक पाळी केव्हाही सुरू हाेऊ शकते. ज्या मुली व महिलांनी काेराेना प्रतिबंधक लसीसाठी नाेंदणी केली आहे, अशांनी लसीकरणाच्या निश्चित तारखेला लस घ्यावी. मासिक पाळी व काेराेना लसीकरणाचा आपसात कुठलाही संबंध नाही. मासिक पाळीदरम्यान औषधी घेऊ नये अथवा लस घेऊ नये, असे कुठेही नमूद केले नाही. मासिक पाळीदरम्यान मुली व महिलांनी काेराेना प्रतिबंधात्मक लस घेतल्यास त्यांची राेगप्रतिकारक शक्ती कमी हाेते, हा साेशल मीडियावर व्हायरल झालेला संदेश व दावा अत्यंत चुकीचा आहे. लसीमुळे राेगप्रतिकारक शक्ती कमी हाेत नाही, असेही डाॅ. चंदा काेडवते यांनी म्हटले आहे.
मासिक पाळीदरम्यान लस घेतल्यास राेगप्रतिकारक शक्ती कमी हाेत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST