मासिक पाळीदरम्यान लस घेतल्यास राेगप्रतिकारक शक्ती कमी हाेत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST2021-05-07T04:38:29+5:302021-05-07T04:38:29+5:30

मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यात काेणताही अडथळा असू नये. प्रत्येक जण वर्क फ्राॅम हाेम करू शकत ...

Vaccination during menstruation does not weaken the immune system | मासिक पाळीदरम्यान लस घेतल्यास राेगप्रतिकारक शक्ती कमी हाेत नाही

मासिक पाळीदरम्यान लस घेतल्यास राेगप्रतिकारक शक्ती कमी हाेत नाही

मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यात काेणताही अडथळा असू नये. प्रत्येक जण वर्क फ्राॅम हाेम करू शकत नाही. तरुण मुली व महिला कामानिमित्त घराबाहेर पडतात. अत्यावश्यक सेवेेत अनेक महिला काम करीत आहेत. त्यामुळे त्यांची मासिक पाळी केव्हाही सुरू हाेऊ शकते. ज्या मुली व महिलांनी काेराेना प्रतिबंधक लसीसाठी नाेंदणी केली आहे, अशांनी लसीकरणाच्या निश्चित तारखेला लस घ्यावी. मासिक पाळी व काेराेना लसीकरणाचा आपसात कुठलाही संबंध नाही. मासिक पाळीदरम्यान औषधी घेऊ नये अथवा लस घेऊ नये, असे कुठेही नमूद केले नाही. मासिक पाळीदरम्यान मुली व महिलांनी काेराेना प्रतिबंधात्मक लस घेतल्यास त्यांची राेगप्रतिकारक शक्ती कमी हाेते, हा साेशल मीडियावर व्हायरल झालेला संदेश व दावा अत्यंत चुकीचा आहे. लसीमुळे राेगप्रतिकारक शक्ती कमी हाेत नाही, असेही डाॅ. चंदा काेडवते यांनी म्हटले आहे.

Web Title: Vaccination during menstruation does not weaken the immune system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.