घोट पीएचसीत ९५६ नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST2021-05-07T04:38:22+5:302021-05-07T04:38:22+5:30

यात पहिला डोस ८६५ तर दुसरा डोस ९१ नागरिकांनी घेतला आहे. हे सर्व ४५ वर्षाच्या वरील नागरिक आहेत. १८ ...

Vaccination of 956 citizens in Ghot PHC | घोट पीएचसीत ९५६ नागरिकांचे लसीकरण

घोट पीएचसीत ९५६ नागरिकांचे लसीकरण

यात पहिला डोस ८६५ तर दुसरा डोस ९१ नागरिकांनी घेतला आहे. हे सर्व ४५ वर्षाच्या वरील नागरिक आहेत. १८ वर्षावरील नागरिकांसाठी अजूनपर्यंत या ठिकाणी लस उपलब्ध झाल्या नाहीत. घोट प्राथमिक आरोग्य केंद्राला आतापर्यंत ९८० डोज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ९५६ डोस देण्यात आले आहेत. घोट पारिसरात लस घेण्यास अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे. या परिसरात ४५ वर्षाच्या अधिक वयाचे सहा हजारपेक्षा अधिक नागरिक आहेत. पंरतु आतापर्यंत एक हजार नागरिकांनी सुद्धा लस घेतलेली नाहीत. त्यात काही गावे अशी आहेत की त्या गावातील नागरिकांनी लस घेण्यास विरोध दर्शविला आहे. साेशल मीडियाच्या माध्यमातून या लसबाबत अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे नागरिक लस घेण्यास तयार नाहीत. आराेग्य विभागाने याबाबत जागृती करण्याची गरज आहे.

Web Title: Vaccination of 956 citizens in Ghot PHC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.