खेडेगाव येथे ५० नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST2021-05-14T04:35:58+5:302021-05-14T04:35:58+5:30

काेराेना विषाणूचा संसर्ग पसरू नये, तसेच लाेकांची राेगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी खेडेगाव येथे काेविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. या ...

Vaccination of 50 citizens against measles at Khedegaon | खेडेगाव येथे ५० नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण

खेडेगाव येथे ५० नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण

काेराेना विषाणूचा संसर्ग पसरू नये, तसेच लाेकांची राेगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी खेडेगाव येथे काेविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. या शिबिरात ५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले तर ६ जणांची काेराेना टेस्ट झाली. दरम्यान, संवर्ग विकास अधिकारी अनिता तेलंग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश दामले, माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट यांनी भेट देत व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश भांडारकर, आरोग्य सहायक वासुदेव दोडके, चारभट्टी आरोग्य पथकातील अनुराग देवसकर, एमपीडब्लू नारायण रामटेके, पी. एम. वालदे, आरोग्य परिचारिका एस.पी.मेश्राम, बी. एफ. मडावी यांनी सेवा बजावली. याप्रसंगी सरपंच येमुलता पेंदाम, उपसरपंच भुमेश सोनवणे, माजी सरपंच टेमनशहा सयाम, दुर्वास बनकर, ग्रामसचिव नितीन घोडीचोर उपस्थित हाेते.

===Photopath===

120521\4000img-20210512-wa0043.jpg

===Caption===

फोटो खेडेगाव येथील शिबीरात सेवा बजावताना आरोग्य कर्मी

Web Title: Vaccination of 50 citizens against measles at Khedegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.