देसाईगंज तालुक्यात १४ हजार नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST2021-05-14T04:35:47+5:302021-05-14T04:35:47+5:30

तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी तालुका आरोग्य विभागामार्फत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत ...

Vaccination of 14,000 citizens in Desaiganj taluka | देसाईगंज तालुक्यात १४ हजार नागरिकांचे लसीकरण

देसाईगंज तालुक्यात १४ हजार नागरिकांचे लसीकरण

तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी तालुका आरोग्य विभागामार्फत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी गावपातळीवर आरोग्य यंत्रणा कार्यरत असून, नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहित करीत आहे. आतापर्यंत कोविशिल्ड या लसीचे ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे पहिले लसीकरण ३ हजार ७८३ नागरिकांना व दुसरी लस २ हजार १८५ नागरिकांनी अशा एकूण ५ हजार ९८६ नागरिकांनी लसीकरण केले.

प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव येथे कोविशिल्डचा पहिला डोस २ हजार ६२१ तर दुसरा डोस ३१६ जणांना देण्यात आला. यात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील एकूण १ हजार ४६ लोकांनी लस घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूड अंतर्गत कोविशिल्डचा पहिला डोस १ हजार ७४० तर दुसरा डोस ३११ नागरिकांना मिळाला. कोव्हॅक्सिन या लसचा प्राथमिक आरोग्य केंद्र सावंगी येथे पहिला डोस २ हजार ६१८ नागरिकांनी तर दुसरा डोस ६ नागरिकांनी घेतला. तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात पहिला डोस ६३४ नागरिकांनी घेतला.

देसाईगंज तालुक्यात दोन्ही लस मिळून आतापर्यंत पहिला डोस ११ हजार ३९६ तर दुसरा डोस २ हजार ८१८ अशा एकूण १४ हजार २१४ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आपल्या सुरक्षेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. अभिषेक कुंभरे यांनी केले आहे.

Web Title: Vaccination of 14,000 citizens in Desaiganj taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.