परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:37 IST2021-04-08T04:37:20+5:302021-04-08T04:37:20+5:30
कोरोना महामारीच्या संकटातच इयत्ता १२ वी व १० वीची बोर्डाची परीक्षा होणार आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी काम करणाऱ्या जिल्ह्यातील ...

परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करा
कोरोना महामारीच्या संकटातच इयत्ता १२ वी व १० वीची बोर्डाची परीक्षा होणार आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी काम करणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी कोरोना लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. त्यामुळे सध्या केवळ ४५ वर्षांवरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी लसीकरणाचा लाभ घेत आहेत. मात्र त्या खालील वयोगटातील अनेक कर्मचारी आहेत. त्यांना सुद्धा कोरोना संसर्गाचा धाेका आहे. ही बाब विचारात घेऊन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण बाेर्डाची परीक्षा सुरू हाेण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. यापूर्वी अनेक शिक्षक काेराेनाबाधित झाले आहेत तर काहींना रोगाची लागण झाल्यामुळे जीव गमवावा लागला. त्यामुळे आरोग्य विभागाला सूचना करून जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.