शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

झोपताना मच्छरदानी वापरा, मलेरियापासून दूर राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:17 AM

मलेरिया रोगाचे सर्वाधिक रूग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळत असल्याने गडचिरोली जिल्हा मलेरियाबाबत अतिशय संवेदनशील समजल्या जातो. येथील वातावरण व भौगोलिक परिस्थिती मलेरियाच्या डासांसाठी अनुकूल असली तरी झोपताना मच्छरदानीचा वापर केल्यास......

ठळक मुद्देजागतिक मलेरिया प्रतिबंधक दिन : गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे आढळतात सर्वाधिक रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मलेरिया रोगाचे सर्वाधिक रूग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळत असल्याने गडचिरोली जिल्हा मलेरियाबाबत अतिशय संवेदनशील समजल्या जातो. येथील वातावरण व भौगोलिक परिस्थिती मलेरियाच्या डासांसाठी अनुकूल असली तरी झोपताना मच्छरदानीचा वापर केल्यास मलेरिया रोगापासून दूर राहता येते, असा सल्ला जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी दिला आहे.हिवतापाचा प्रसार अ‍ॅनोफिलीस डासांच्या मादीमार्फत होते. या डासांची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नदी, नाले, पाण्याच्या टाक्या, कालवे इत्यादीमध्ये हिवताप प्रसारक अ‍ॅनोफिलीस डासाची मादी अंडे देते. त्यामुळे डासांची पैदास वाढते. मलेरियाचा डास हिवताप रूग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात. तेथे त्यांची वाढ होऊन डासांच्या लाडेवाटे चावल्यानंतर निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. निरोगी मनुष्याच्या शरीरात हे जंतू यकृतामध्ये जातात व त्यांची वाढ होऊन १० ते १२ दिवसांनी हिवतापाची लक्षणे दिसून येतात. दरवर्षी जगभरात सुमारे ३० ते ५० कोटी लोकांना हिवतापाची लागन होते. त्यापैकी सुमारे १० लाख लोक हिवतापाने मृत्यूमुखी पडतात. उष्ण व दमट हवामान आवश्यक असल्याने हिवताप हा प्रामुख्याने उष्णकटीबंधाच्या प्रदेशामध्ये आढळून येतो. हिवताप हा आजार कोणालाही होऊ शकतो. हिवताप ग्रस्त भागात राहणाºया लोकांमध्ये हा रोग अधिक प्रमाणात आढळून येते. तसेच हिवतापग्रस्त भागातून स्थलांतरीत हिवताप रूग्णांमुळे हिवतापाचा प्रादुर्भाव इतर भागातील लोकांना होतो. देशातील ओडीशा, पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्टÑ आदी राज्यांमध्ये हिवतापाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून येतो. गरोदरपणातील हिवतापामुळे अपुरे दिवसाचे बाळ जन्माला येणे, गर्भपात होणे, जन्मजात मृत्यू असे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे या कालावधीत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.मलेरिया प्रतिबंधक उपाययोजनापाण्याच्या टाक्यात डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून त्या दुरूस्त कराव्यात. त्यास झाकण बसवावे. दैनंदिन वापराच्या पाण्याकरिता घरामधील तसेच घराबाहेरील पिंप आठवड्यातून दोनदा रिकामे करून ते पूर्णपणे वाळवावे व त्यानंतर पाणी भरावे. डासांचा उपद्रव टाळण्यासाठी पाण्याच्या सर्व टाक्या व पाण्याचे साठे डासप्रतिबंधक स्थितीत व्यवस्थित झाकून ठेवावे. इमारतीच्या गच्चीवर किंवा परिसरात अनावश्यक पाणी साचू देऊ नये. झोपताना हातपाय झाकले जातील अशा पायघोळ कपड्यांचा वापर करावा. डास प्रतिबंधक क्रीम वापरावे. झोपताना मच्छरदानीचा वापर करणे हा सर्वाधिक चांगला उपाय आहे.हिवतापाची लक्षणेथंडी वाजून ताप येणे, एक दिवसाआड ताप येणे, ताप आल्यानंतर घाम येऊन अंग गार पडते, डोके दुखणे, उलट्या होणे आदी लक्षणे दिसून येतात.हिवतापदूषित डासांनी चावल्यानंतर १० दिवस ते चार आठवड्यात हिवतापाची चिन्हे दिसून येतात. संसर्गानंतर लवकरात लवकर सात दिवस व उशिरा एक वर्षापर्यंत हिवतापाची लक्षणे आढळतात. काही जंतू आपल्या यकृतामध्ये सुप्तावस्थेत लपून राहू शकतात. पोषक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर लाल रक्तपेशींवर हल्ला करून रोगाची पुन्हा लागण होते.