अवकाळी पावसाचा कापणी झालेल्या धानाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 22:52 IST2020-11-22T22:51:37+5:302020-11-22T22:52:15+5:30
काेरची तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे धान व इतर पिकांचे अनेकदा नुकसान केले. राेगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना दाेन ते तीनदा कीटकनाशकाची फवारणी करावी लागली. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड बसला. त्यानंतर शेतकऱ्यांनी अनेकदा धान व इतर पिकांची याेग्यरित्या देखभाल केली. धान पीक हाती येण्यापूर्वी शेतातील उभ्या धानाची कापणी केल्यानंतर निसर्गाची शेतकऱ्यांवर पुन्हा अवकृपा झाली.

अवकाळी पावसाचा कापणी झालेल्या धानाला फटका
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेरची : तालुक्याच्या काेटगूल परिसरात २० नाेव्हेंबर राेजी शुक्रवारला सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस बरसला. दरम्यान कापणी केलेले धानाचे पीक पावसात सापडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पाण्यामुळे धान कुजून खराब हाेण्याची दाट शक्यता आहे.
काेरची तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे धान व इतर पिकांचे अनेकदा नुकसान केले. राेगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना दाेन ते तीनदा कीटकनाशकाची फवारणी करावी लागली. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड बसला. त्यानंतर शेतकऱ्यांनी अनेकदा धान व इतर पिकांची याेग्यरित्या देखभाल केली. धान पीक हाती येण्यापूर्वी शेतातील उभ्या धानाची कापणी केल्यानंतर निसर्गाची शेतकऱ्यांवर पुन्हा अवकृपा झाली. अवकाळी पाऊस बरसल्याने कापलेल्या धानाच्या कडपा पावसात भिजल्या तसेच शेतजमिनीत पावसाचे पाणी साचले आहे. अनेक शेतकऱ्यांनी लाखाेळी बांध्यांमध्ये टाकली हाेती. हे लाखाेळी पीक कुजू शकते.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काेटगूल क्षेत्राच्या जि. प. सदस्य सुमित्रा लाेहंबरे, श्रावण मातलाम, दामेसाय जाळे, रंजित मडावी, रामदास हारामी, नरपतसिंह नैताम आदींनी केली आहे.