राेहयाे कर्मचाऱ्यांवर बेराेजगारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST2021-03-17T04:37:25+5:302021-03-17T04:37:25+5:30

गडचिराेली : राेजगार हमी याेजनेंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या राेहयाे कर्मचाऱ्यांची सेवा २८ फेब्रुवारीपासून समाप्त करण्यात आली आहे. जिल्ह्यात ...

Unemployment crisis on state employees | राेहयाे कर्मचाऱ्यांवर बेराेजगारीचे संकट

राेहयाे कर्मचाऱ्यांवर बेराेजगारीचे संकट

गडचिराेली : राेजगार हमी याेजनेंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या राेहयाे कर्मचाऱ्यांची सेवा २८ फेब्रुवारीपासून समाप्त करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ११९ कंत्राटी कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांवर आता बेराेजगारीचे संकट काेसळले आहे. त्यांना पूर्वीप्रमाणेच जिल्हा सेतू समितीद्वारे नियुक्ती द्यावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

राेहयाेची कार्यालयीन कामे करण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर जिल्ह्यात ११९ कर्मचारी नेमले हाेते. या कर्मचाऱ्यांना जिल्हा सेतू समितीमार्फत नियुक्ती आदेश दिला जात हाेता. मात्र आता शासनाने बाह्य संस्थेकडून कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बाह्य संस्थेमार्फत नेमणुकीस कर्मचाऱ्यांचा विराेध आहे. तसेच या कर्मचाऱ्यांची सेवा जुलै महिन्यापर्यंत असताना अचानक २८ फेब्रुवारीपासूनच त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. मागील १० वर्षांपासून हे कर्मचारी राेहयाे विभागात कार्यरत हाेते. यावरच त्यांच्या संसाराचा गाडा सुरू हाेता. मात्र अचानक सेवामुक्त केल्याने बेराेजगारीचे संकट काेसळले आहे. याबाबत या कर्मचाऱ्यांनी शासनाला निवेदन पाठविले आहे.

निवेदनावर किरण गज्जलवार, इशा मडावी, धीरज देवगडे, राजू बाेंडे, जाेत्सना मैंद, विनाेद नाकताेडे, राजेश मानकर, पंकजकुमार खरवडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बाॅक्स....

या आहेत मागण्या

बाह्य संस्थेकडून नेमणूक रद्द करावी. राज्य निधी सेवा असाेसिएशन अथवा जिल्हा सेतू समितीमार्फत नियुक्ती आदेश द्यावा. या कर्मचाऱ्यांना महात्मा गांधी ग्रामीण राेजगार हमी याेजना असेपर्यंत सेवा संरक्षण द्यावे, समान काम, समान वेतन लागू करावा. सर्व कर्मचाऱ्यांना पीएफ, विमा लागू करावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

Web Title: Unemployment crisis on state employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.