निकृष्ट दर्जाचे खत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:14 IST2019-07-16T23:14:11+5:302019-07-16T23:14:27+5:30

शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा उचलत कमी दर्जाच्या खताची विक्री करणाºया पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच एक ट्रक खतसाठा जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई सोमवारी सायंकाळी चिचोली गावात करण्यात आली.

Underground quality seized | निकृष्ट दर्जाचे खत जप्त

निकृष्ट दर्जाचे खत जप्त

ठळक मुद्देपाच आरोपींना अटक : ट्रकच्या सहाय्याने गावात केली जात होती विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा उचलत कमी दर्जाच्या खताची विक्री करणाºया पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच एक ट्रक खतसाठा जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई सोमवारी सायंकाळी चिचोली गावात करण्यात आली.
नागपूर येथील एमआयडीसी परिसरातील अ‍ॅग्रोसिल बायोटेक कंपनीचे सुपर सिलिका नावाचे खत धानोरा तालुक्यातील चिचोली येथे विक्री केले जात होते. कमी किमतीत खताची विक्री केली जात होती. कमी किमतीत खत मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी खताची खरेदी केली. मात्र काही नागरिकांना खताच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली. याबाबतची माहिती धानोरा पोलीस व कृषी विभागाच्या अधिकाºयांना देण्यात आली. खत निरीक्षक कृष्णदास दोनाडकर यांनी घटनास्थळ गाठून खताच्या दर्जाची पाहणी केली. खत संशयास्पद आढळले. इन्व्हाईस चालन तपासले असता, सुपर सिलिका कंपनीचे ३६० बॅग व सुपर ग्रो कंपनीच्या १५० बॅगची नोंद होती. ट्रकमधील संपूर्ण खताची विक्री झाली होती. पीकअप वाहनामध्ये सुपर सिलिका खताच्या ३७ ते सुपर ग्रोच्या सात बॅग आढळून आल्या. सुपर सिलिका खताची किंमत प्रती बॅग ६५० रुपये व सुपर ग्रो खताची प्रती बॅग किंमत ८५० रुपये आहे. जप्त केलेल्या सुपर सिलिका खताची किंमत २४ हजार ५० व सुपर ग्रोची किंमत ५ हजार ९५० रुपये असा एकूण ३० हजार रुपयांचा खतसाठा जप्त केला. तसेच ट्रक व पीकअप वाहन सुद्धा जप्त केले.
याप्रकरणी मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील राकेश वासुदेव गेडाम (२८), चंद्रपूर तालुक्यातील पिपरी येथील विवेक उत्तम निमरड (२४), चिमूर तालुक्यातील प्रल्हांद पांडुरंग भेंडारे (४४), धानोरा तालुक्यातील पवनी येथील संजय बारिकराव गावडे (२९), वरोरा येथील सुरेंद्र तुकाराम ढोकणे (३८) यांना अटक केली आहे.
या आरोपींविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंके, पोलीस उपनिरीक्षक हिंमतराव सरगर, पोलीस शिपाई अमोल कोराम, रोशन केळझरकर, प्रकाश कृपाकर, कृषी विभागाचे खत निरीक्षक कृष्णदास दोनाडकर, मंडळ कृषी अधिकारी एल.एस.पाठक, कृषी पर्यवेक्षक एन.जी.बडवाईक यांनी केली.
खताचे नमूने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. नमून्यांचा अहवाल आल्यानंतरच खताचा नेमका दर्जा कळण्यास मदत होईल.

Web Title: Underground quality seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.