शिक्षक दिनानिमित्त ‘थँक्स अ टीचर’ अभियानांतर्गत शिक्षकांचा हाेणार गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST2021-09-05T04:41:27+5:302021-09-05T04:41:27+5:30
विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अशा सर्व ...

शिक्षक दिनानिमित्त ‘थँक्स अ टीचर’ अभियानांतर्गत शिक्षकांचा हाेणार गाैरव
विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अशा सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने २ ते ७ सप्टेंबर या कालावधीत ‘थँक्स अ टिचर’ अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर व समाज सक्रिय सहभागी हाेणार आहेत.
बाॅक्स
विविध उपक्रमांचे आयाेजन
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, असा शासन निर्णय आहे. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन आयोजन होणार असून, तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा, असे सांगितले आहे.