लोखंडी रेलिंगला दुचाकीची धडक; पती ठार, पत्नी जखमी

By दिलीप दहेलकर | Updated: April 24, 2025 02:17 IST2025-04-24T02:16:57+5:302025-04-24T02:17:16+5:30

चामाेर्शी मार्गावरील दर्शनी फाट्यानजीकची घटना...

Two-wheeler hits iron railing; Husband killed, wife injured | लोखंडी रेलिंगला दुचाकीची धडक; पती ठार, पत्नी जखमी

लोखंडी रेलिंगला दुचाकीची धडक; पती ठार, पत्नी जखमी

गडचिराेली : बाहेरगावी गेलेले दाेघे पती पत्नी दुचाकीने गडचिरोली मार्गे चामोर्शीकडे परत येत होते. वाटेत दुचाकीवरील नियंत्रण सुटून राष्ट्रीय महामार्गाच्या लोखंडी रेलिंगला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना २३ एप्रिल राेजी दुपारी ४. ३० वाजेच्या सुमारास दर्शनी फाट्याजवळ घडली.

मोरेश्वर सातपुते (६० ,रा. चामाेर्शी) असे मृतकाचे नाव असून त्यांची पत्नी सुमन मोरेश्वर सातपुते (५५) या गंभीर जखमी आहेत. मोरेश्वर सातपुते हे पत्नीला आणण्यासाठी केरोडा (ता. सावली जि. चंद्रपूर)येथे दुचाकीने गेले होते. गडचिरोली मार्गे चामोर्शी येथे परत येत असताना पाणी पिण्यासाठी दुचाकीचा वेग कमी करण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दर्शनी जवळच रोडच्या बाजूला असलेल्या लोखंडी रेलिंगला दुचाकीचे धडक बसली. त्यात मोरेश्वर हे रेलिंगला लटकून जागीच ठार झाले तर पत्नी सुमन मोरेश्वर सातपुते गंभीर जखमी झाल्या. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील तपास गडचिराेली पाेलिस करीत आहेत.

फाेटाे - मृतक माेरेश्वर सातपुते

Web Title: Two-wheeler hits iron railing; Husband killed, wife injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात