दोन शिक्षकांचे वेतन काढले
By Admin | Updated: May 30, 2014 23:42 IST2014-05-30T23:42:44+5:302014-05-30T23:42:44+5:30
अहेरी पंचायत समिती अंतर्गत एक अविवाहीत महिला शिक्षिका मुळ पदस्थापनेवर कार्यरत आहे. मात्र या महिला शिक्षिकेचे वेतन वेलगुरच्या जिल्हा परिषद शाळेतून काढून पंचायत समितीच्या

दोन शिक्षकांचे वेतन काढले
एकाच आस्थापनेवर : अहेरी पं. स. शिक्षण विभागातील प्रकार
आलापल्ली : अहेरी पंचायत समिती अंतर्गत एक अविवाहीत महिला शिक्षिका मुळ पदस्थापनेवर कार्यरत आहे. मात्र या महिला शिक्षिकेचे वेतन वेलगुरच्या जिल्हा परिषद शाळेतून काढून पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आपल्या अकलेचे वाभाडे काढले आहे. विशेष म्हणजे एकाच आस्थापनेवर दोन पदवीधर शिक्षकांचे वेतन काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
प्राप्त माहितीनुसार अहेरी पंचायत समिती अंतर्गत एका अविवाहित महिला शिक्षिकेची मुळ पदस्थापना दुसरीकडे आहे. मात्र या शिक्षिकेचे वेतन वेलगुरच्या शाळेतून काढण्यात येते. महिन्याकाठी ४0 हजार रूपये वेतन उचलणारी ही पदवीधर शिक्षिका असून सध्या ती तिसर्याच ठिकाणी म्हणजे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत आहे. मागील सहा महिन्यापासून या शिक्षिकेला वेतन दिले जात असून मात्र मुळ पदस्थापनेच्या ठिकाणी वर्ग रिकामाच आहे. यामुळे विद्यार्थी वार्यावर असतांनासुद्धा अहेरी पंचायत समितीला गुणवत्तेशी काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. या प्रकाराकडे केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे सदर शिक्षिकेचे वर्तन खूप उद्धटपणाचे असल्याचे समजते.
देचलीपेठा, दामरंचासारख्या दुर्गम भागात पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त असतांना अहेरी पंचायत समितीच्या अधिकार्यांचे या अविवाहित पदवीधर शिक्षिकेवर भलतीच मेहर नजर असल्याचे दिसून येते. ६ महिन्यापूर्वी सदर शिक्षिकेच्या गैरवर्तनाबाबत शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांनी पंचायत समितीकडे तक्रार केली. अधिकार्यांनी थातूरमातूर चौकशी करून सदर प्रकरण दाबले. या शिक्षिकेच्या गैरवर्तनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र उलट सदर शिक्षिकेला शैक्षणिक कार्य करण्यासाठी इतरत्र पदस्थापना देण्यात आली, अशी माहिती एका ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यांनी दिली आहे.
याबाबत अहेरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विचारणा केली. यावर तीन महिन्याचे वेतन चुकीमुळे काढण्यात आले, मात्र आता त्यामध्ये दुरूस्ती करू, एवढेच बोलून त्यांनी भ्रमणध्वनी बंद केला. यावरून याप्रकरणात अहेरी पंचायत समितीच्या अधिकार्यांकडून कमालीची गुप्तता बाळगल्या जात असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)