दुचाकी अपघातात दोन पोलिसांसह तिघे जखमी
By Admin | Updated: June 24, 2017 01:18 IST2017-06-24T01:18:33+5:302017-06-24T01:18:33+5:30
येथून ८ किमी अंतरावर असलेल्या काकडवेली गावाजवळ दुचाकीला अपघात झाल्याने दोन पोलिसांसह तिघे जखमी झाल्याची घटना

दुचाकी अपघातात दोन पोलिसांसह तिघे जखमी
गडचिरोलीला हलविले : काकडवेलीजवळील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : येथून ८ किमी अंतरावर असलेल्या काकडवेली गावाजवळ दुचाकीला अपघात झाल्याने दोन पोलिसांसह तिघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
जखमी पोलिसांमध्ये गुरूदेव मनीकांत दुग्गा (२९) व गणेश बारिकराव पदा (२५) यांचा समावेश आहे. तर याच अपघातात श्रीकांत सोमा आलाम (३२) हा युवकही जखमी झाला आहे. तिघेही जण पल्सर दुचाकीने गडचिरोलीकडे जात होते. दरम्यान काकडवेली गावाजवळ दुचाकी स्लिप झाली. त्यामुळे तिघेहीजण खाली कोसळले. तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.