गडचिरोली जिल्ह्यात उडालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 12:06 IST2021-04-28T12:06:33+5:302021-04-28T12:06:53+5:30
Gadchiroli news naxal एटापल्ली तालुक्यातील जंभिया-गट्टा पोलीस मदत केंद्राच्या परिसरातील जंगलात बुधवारी सकाळी उडालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले.

गडचिरोली जिल्ह्यात उडालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जंभिया-गट्टा पोलीस मदत केंद्राच्या परिसरातील जंगलात बुधवारी सकाळी उडालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून अजूनही जंगल परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
जांभिया-गट्टा पोलीस मदत केंद्रावर तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. हॅन्डग्रेनेडही फेकला होता. पण तो निकामी होता. पोलिसांना बाहेर येण्यासाठी प्रवृत्त करून घातपात घडविण्याचा डाव असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी सावध पवित्रा घेत नक्षलवाद्यांचा तो डाव हाणून पाडला होता. दरम्यान नक्षलविरोधी अभियान राबविणारे सी-60 पोलीस पथक जंगल परिसरात शोधमोहीम राबवत असताना बुधवारी सकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात दोन पुरुष नक्षलवादी ठार झाले. नक्षलवाद्यांनी दि.26 ला बंदचे आवाहन करत अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथे रस्त्याच्या कामावरील वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर झालेल्या या कारवाईने नक्षल्यांना हादरा बसला आहे.