दोन महिन्यात ८० वर गार्इंनी सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 06:00 AM2019-12-11T06:00:00+5:302019-12-11T06:00:17+5:30

पशुसंवर्धन आयुक्तालयाने कोणतीही शहानिशा न करता ज्या पद्धतीने घाईघाईने सदर कंपनीला लाखमोलाच्या ३८३ गाई बहाल केल्या त्यावरून हा संपूर्ण व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. गायींना ठेवण्याची योग्य व्यवस्था, सोयी-सुविधा नसताना त्याबाबत कोणतीही शहानिशा न करता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सदर कंपनीच्या ताब्यात गाई आणि वासरं मिळून ३८३ जनावरे देण्यात आली.

In two months, the 80 cow died | दोन महिन्यात ८० वर गार्इंनी सोडले प्राण

दोन महिन्यात ८० वर गार्इंनी सोडले प्राण

Next
ठळक मुद्देविमाही काढला नाही : मौल्यवान गार्इंच्या मालकी हक्कापासून शेतकरी वंचित

मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतकऱ्यांची कंपनी म्हणून गोंडवाना स्मॉल फार्मर प्रोड्युसर कंपनीला पशुसंवर्धन विभागामार्फत दोन महिन्यांपूर्वी देण्यात आलेल्या भारतीय लष्कराच्या महागड्या फ्रिजवाल गाई प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालेल्याच नाहीत. शेतकºयांच्या नावाने लाटलेल्या या गाई दोन महिन्यांपासून सदर कंपनीने आपल्याच ताब्यात ठेवल्या आहे. विशेष म्हणजे त्यांची योग्य देखभाल होत नसल्यामुळे दोन महिन्यात ३८३ पैकी ८० पेक्षा जास्त गार्इंनी प्राण सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पशुसंवर्धन आयुक्तालयाने कोणतीही शहानिशा न करता ज्या पद्धतीने घाईघाईने सदर कंपनीला लाखमोलाच्या ३८३ गाई बहाल केल्या त्यावरून हा संपूर्ण व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. गायींना ठेवण्याची योग्य व्यवस्था, सोयी-सुविधा नसताना त्याबाबत कोणतीही शहानिशा न करता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सदर कंपनीच्या ताब्यात गाई आणि वासरं मिळून ३८३ जनावरे देण्यात आली. पण पुणे ते गडचिरोली या प्रवासातच त्यातील ३३ जनावरांचा मृत्यू झाला. उर्वरित ३५० पैकी दोन महिन्यात पुन्हा ५० वर गाई दगावल्या आहेत. त्यामुळे आता ३८३ पैकी जेमतेम ३०० च्या घरात गाई शिल्लक आहेत. योग्य दखल न घेतल्यास गायी दगावण्याचा हा क्रम असाच सुरू राहून वर्षभरात सर्वच गाई दगावतात की काय? अशी भीती खुद्द पशुसंवर्धन विभागाचे अधिकारीच आता व्यक्त करत आहेत.
भारतीय लष्कराच्या या दुधाळू गायींची किंमत प्रत्येकी लाखाच्या घरात आहे. पण गरजवंत शेतकऱ्यांना गायी मिळतील आणि त्यांच्या उत्पान्नात भर पडेल म्हणून नाममात्र १२०० रुपये प्रतिगाय मोबदला आकारून या गायी देण्यात आल्या. मात्र अद्याप एकाही शेतकºयाच्या ताब्यात गाय देण्यात आलेली नाही. गायींना ओळखता यावे म्हणून त्यांना पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने टॅग लावले. पण पशुसंवर्धन विभागाकडून गायी सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र घेऊन विमा काढण्यात आलेला नाही. कारण विमा काढण्यासाठी संबंधित पशुपालक शेतकºयाचे गाईसोबतचे छायाचित्र आणि इतर कागदपत्रांची गरज असते. इथे मात्र लाभार्थी पशुपालक कोण हेच ठरलेले नसल्यामुळे कोणत्याही गायीचा विमा उतरविणे कंपनीला शक्य झालेले नाही. परिणामी एकामागून एक गायीमरण पावत असतानाही त्या लाखमोलाच्या गायींचा कोणताही मोबदला विमा कंपनीकडून मिळवता आलेला नाही.
शेतकºयांना गायींचे वाटप झाले नाही. गोंडवाना बँडही अस्तित्वात आला नाही. मग या गार्इंचे दूध नेमके कुठे जात आहे आणि त्याचा मोबदला कोण लाटत आहे, हाच खरा संशोधनाचा विषय झाला आहे.

गोंडवाना ब्रँडबाबत अधिकारीच अनभिज्ञ
शेतकºयांना (पशुपालक) फ्रिजवल गायी देऊन त्यांच्या भागीदारीतून गोंडवाना स्मॉल फार्मर प्रोड्युसर कंपनीने गोंडवाना दूध ब्रँड अस्तित्वात आणायचा होता. याबाबत जिल्हा दूग्धविकास अधिकारी सचिन यादव यांना विचारले असता, फ्रिजवाल गाई घेतलेल्या सदर कंपनीला दुधाच्या उत्पादनासाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपल्यावर असली तरी अद्याप या कंपनीने कोणतेही मार्गदर्शन घेतले नसल्याचे सांगितले. दुधाचा गोंडवाना ब्रँडही अद्याप अस्तित्वात आला नसल्याची माहिती त्यांनी दिली.

- तर त्या कंपनीकडून गाई परत घेणार
गाई वाटप केल्यानंतर मी गेल्या महिन्यात आरमोरी येथील या प्रकल्पाच्या साईटला भेट दिली होती. त्यावेळी तिथे बºयापैकी व्यवस्था होती. मात्र कंपनीचे भागधारक म्हणून दाखविलेले कोणतेही शेतकरी मला भेटले नाही. शेतकरी कुठे आहेत असा प्रश्नही मी केला होता. वास्तविक या दूध उत्पादनाचा वाटा शेतकऱ्यांनाच मिळायला हवा. ही योजना शेतकºयांसाठीच आहे. पण तसे होताना दिसत नसेल तर सदर कंपनीला वाटलेल्या गाई परत घेऊन त्या शेतकºयांना वाटप केल्या जाईल.
- डॉ.डी.डी. परकाळे, अतिरिक्त आयुक्त,
पशुसंवधन विभाग, पुणे

Web Title: In two months, the 80 cow died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cowगाय