भरधाव ट्रकची धडक, दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST2020-02-06T06:00:00+5:302020-02-06T06:00:33+5:30

विशेष म्हणजे मृतक प्रकाश कोसरे यांनी दुचाकीवरून जाताना डोक्यात हेल्मेट घातलेले नव्हते. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते जागीच मरण पावले. डोक्यात हेल्मेट असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. गेल्या चार दिवसात दुचाकीवरील हा तिसरा अपघात आहे. त्यातील कोणत्याही दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलेले नव्हते.

Two killed in heavy truck collision | भरधाव ट्रकची धडक, दुचाकीस्वार ठार

भरधाव ट्रकची धडक, दुचाकीस्वार ठार

ठळक मुद्देसमोरासमोर धडक : पाठलाग करून पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क
पोेर्ला : दुचाकीने आपल्या घरी जाण्यासाठी निघालेल्या इसमाला समोरून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गडचिरोली-आरमोरी मार्गावरील पोर्लाजवळ दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला. प्रकाश आत्माराम कोसरे (४७) रा.वसा असे मृताचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मूळचा अकोला येथील असलेले प्रकाश कोसरे वसा येथे भाड्याच्या खोलीत राहून पोर्लाजवळच्या लक्ष्मी कंन्स्ट्रक्शन कंपनीत व डांबर प्लान्टमध्ये वाहने दुरूस्तीचे काम करत असे. बुधवारी दुपारी ते जेवण करण्यासाठी मोटारसायकल (एमएच ३१, बीझेड ७०८६) ने वसाकडे जात असताना आरमोरीकडून गडचिरोलीकडे निघालेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात कोसरे जागीच ठार झाले.
दुचाकीला धडक देताच ट्रकचालकाने तेथून पळ काढला. पण काही युवकांनी पाठलाग करून त्याला गोगावनजिक पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, एएसआय कुमरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
विशेष म्हणजे मृतक प्रकाश कोसरे यांनी दुचाकीवरून जाताना डोक्यात हेल्मेट घातलेले नव्हते. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते जागीच मरण पावले. डोक्यात हेल्मेट असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. गेल्या चार दिवसात दुचाकीवरील हा तिसरा अपघात आहे. त्यातील कोणत्याही दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलेले नव्हते.

Web Title: Two killed in heavy truck collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात