शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

दोन केबलधारकांनी करमणूक कर बुडविला

By admin | Updated: April 3, 2017 02:18 IST

केबलधारकांना दरवर्षी प्रशासनाकडे करमणूक कर भरावा लागतो. मात्र देसाईगंज शहरातील दोन केबलधारकांनी

तपासणीत आढळल्या अधिक जोडण्या देसाईगंज : केबलधारकांना दरवर्षी प्रशासनाकडे करमणूक कर भरावा लागतो. मात्र देसाईगंज शहरातील दोन केबलधारकांनी करमणूक कर बुडविल्याची बाब उघडकीस आली आहे. कारण त्यांच्याकडे निरिक्षणानंतर केबल जोडणीची संख्या अधिक दिसून आली. येथील एका केबलधारकाकडे निरिक्षणापूर्वी २५१ जोडण्या होत्या. निरिक्षणानंतर २९३ केबल जोडण्या दिसून आल्या. संबंधित केबलधारकाकडे ४२ वाढीव जोडण्या निरिक्षणानंतर आढळून आल्या. तर दुसऱ्या एका केबलधारकाकडे निरिक्षणापूर्वी १०५ जोडण्या होत्या. निरिक्षणानंतर १२३ जोडण्या दिसून आल्या. विशेष म्हणजे, या केबलधारकाकडे ७८ जोडण्या अधिकच्या दिसून आल्या. मुंबई करमणूक कर अधिनियम १९२३ चे कलम ३ (४) अन्वये अटी व शर्तीचे तसेच प्रशासकीय आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित केबलधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. महाराष्ट्र करमणूक कर अधिनियम १९२३ च्या कलम ५ अन्वये सुधारीत राजपत्र २५ जून २०११ च्या कलम ४ नुसार ५० अथवा महसूल हानीच्या १० पट यापैकी जे जास्त असेल अशा दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र देसाईगंजच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी अधिक केबल जोडण्या आढळून आलेल्या संबंधित केबलधारकांकडून अत्यल्प दंडाची कारवाई केल्याचा आरोप अमित नंदलाल देवानी यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, देसाईगंजच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी एका केबलधारकाकडून अत्यल्प दंड वसूल केला आहे. त्यामुळे शासनाचा ४७ हजार रूपयांचा महसूल बुडाला आहे. मुंबई करमणूक कर १९२३ च्या अधिनियमानुसार महसूल हानीच्या १० पट अथवा ५० हजार रूपये यापैकी जी जास्त असेल ती रक्कम वसूल करण्याचे शासनाचे नियम आहे. मात्र शासन आदेश धुडकावले आहेत, त्यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)