शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल चोरीचा संशय, बारा विद्यार्थ्यांना शिपायाने बेदम झोडपले; निवासी शाळेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 21:52 IST

वांगेपल्लीच्या शासकीय निवासी शाळेत ही संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी अहेरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय अनुसूचित जाती मुलांच्या निवासी शाळेत एका शिपायाने मोबाइल चोरीच्या संशयातून  बारा विद्यार्थ्यांना छडीने अमानुष मारहाण केली. एक पालक शाळेत मुलास भेटण्यासाठी गेले असता ही घटना ३१ जानेवारीला उघडकीस आली. या प्रकरणी अहेरी पोलिसांनी आरोपी शिपायाविरुध्द  गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, अजय रमेश चंद्रगिरीवार (वय २७, रा. खमनचेरू ता. अहेरी) असे  सेवकाचे नाव आहे. तो वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेत सेवक म्हणून कार्यरत आहे. ३१ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास,  सातवीत शिकणाऱ्या पीयूष तलांडे (१३)  व ११ लहान बालकांना मोबाइल चोरी का केला, असा जाब विचारला. विद्यार्थ्यांनी मोबाइल चोरी केला नाही, असे उत्तर देताच संतापाच्या भरात त्याने एकेकाला छडीने झोडपण्यास सुरुवात केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की, त्यात बालकांना   दुखापत झाली आहे.

​पित्याच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद

आपल्या मुलाला आणि इतर बालकांना विनाकारण मारहाण झाल्याचे समजताच पीयूषचे वडील जीवन उर्फ जिब्बा देसू तलांडे (रा. पैमा, ता. एटापल्ली) यांनी तातडीने अहेरी पोलिस ठाणे गाठले. त्यांच्याफिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अजय चंद्रगिरीवार विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१) आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शाळेचा कारभार रामभरोसे

घटनेनंतर शाळेत पोहोचलेल्या पालकांना तिथे एकही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी आढळला नाही. नियमानुसार शाळेत अधीक्षक, अधीक्षिका, पहारेकरी आणि शिपाई उपस्थित असणे बंधनकारक आहे. मात्र, घटनेच्या वेळी शाळा प्रशासन पूर्णपणे बेपत्ता होते.

निवासी शाळेतील बालकांना मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून,  दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. - हर्षल  ऐकरे, पोलीस निरीक्षक, अहेरी.

English
हिंदी सारांश
Web Title : Warder Beats Students Suspected of Theft; Residential School Incident

Web Summary : A warder in a residential school in Gadchiroli brutally beat twelve students suspected of mobile theft. Police arrested the warder following a complaint by a parent. The school administration was absent during the incident, raising concerns about safety.
टॅग्स :Studentविद्यार्थीTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारी