गडचिरोली जिल्ह्यात ट्रक उलटला, मात्र जीवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 22:16 IST2020-09-14T22:15:31+5:302020-09-14T22:16:06+5:30
धानोरा-रांगी मार्गावर धानोपासून एक किमी अंतरावर रोडवर उभा असलेला ट्रक रस्ता खचल्याने उलटला. मात्र यात जीवितहानी झाली नाही. ही घटना १४ सप्टेंबर रोजी सोमवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

गडचिरोली जिल्ह्यात ट्रक उलटला, मात्र जीवितहानी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: धानोरा-रांगी मार्गावर धानोपासून एक किमी अंतरावर रोडवर उभा असलेला ट्रक रस्ता खचल्याने उलटला. मात्र यात जीवितहानी झाली नाही. ही घटना १४ सप्टेंबर रोजी सोमवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
धानोरा-रांगी मार्गाच्या रोडचे काम सुरू आहे. या कामावर रोडवर पसरविण्यासाठी काळी गिट्टी गडचिरोलीवरून आणली जात आहे. ११ सप्टेंबर रोजी शुक्रवारला गडचिरोलीवरून चार ट्रक गिट्टी भरून आले. काम सुरू असलेल्या ठिकाणापासून जवळच रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करण्यात आला होता. रोडवर गिट्टी टाकण्याच्या प्रतीक्षेत असलेला एमएच ३३ पी ११२२ क्रमांकाचा ट्रक उभा होता. ट्रकचालक संजय कन्नाके रा.आष्टी याने हा ट्रक उभा करून खाली उतरला. फोनवर बोलत असताना अचानक हा ट्रक रोड खचल्याने उलटला. सुदैवाने यावेळी ट्रकमध्ये कुणीच नसल्याने जीवितहानी टळली.