Truck hits ST bus in Gadchiroli; No casualty | गडचिरोलीत ट्रकची एसटी बसला धडक; जिवीतहानी नाही
गडचिरोलीत ट्रकची एसटी बसला धडक; जिवीतहानी नाही

ठळक मुद्देबस चालकाने राखले प्रसंगावधान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: आलापल्लीनजीक असलेल्या सिरोंचा-चंद्रपूर मार्गावरील भंबारा चौकात सोमवारी सकाळी एका ट्रकने एसटी बसला धडक दिली. यात बसचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी झाली नाही. हा अपघात सकाळी ६.३० च्या सुमारास झाला.
ट्रक क्र.सीजी ०८ एल १२६२ हा सिरोंचावरून चामोर्शीकडे जात होता. याच वेळी अहेरीकडून एटापल्लीकडे जाणारी बस क्रमांक एम एच ४०एक्यू ६०९४ यांच्यात धडक झाली.
बस मध्ये एकूण ४ प्रवासी होते.बस चौकात आली असता सिरोंचा मार्गवरून ट्रक येत असल्याचे दिसले. चालक विनोद सरनाईक यांनी प्रसंगावधान राखत ब्रेक लावून बस बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे बसच्या समोरील बाजूस काही झाले नाही आणि समोरील बाजूने बसलेले प्रवासी बचावले.
घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, अहेरी एसटी आगार व्यवस्थापक युवराज राठोड, आगार प्रमुख जितेंद्र राजवैद्य यांनी घटनास्थळी धाव घेतली. आमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.


Web Title: Truck hits ST bus in Gadchiroli; No casualty
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.