नामदेवराव गडपल्लीवार यांना संघटनांतर्फे श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:37 IST2021-05-18T04:37:42+5:302021-05-18T04:37:42+5:30

श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत होते. याप्रसंगी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विचार मंचचे प्रकाश ...

Tributes paid to Namdevrao Gadpalliwar by the organizations | नामदेवराव गडपल्लीवार यांना संघटनांतर्फे श्रद्धांजली

नामदेवराव गडपल्लीवार यांना संघटनांतर्फे श्रद्धांजली

श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत होते. याप्रसंगी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विचार मंचचे प्रकाश अर्जुनवार, आदिवासी विकास परिषदेच्या कुसुमताई अलाम, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विलास निंबोरकर, वीर बाबूराव आदिवासी प्रबोधन समितीचे वसंतराव कुलसंगे, सम्यक समाज समितीचे हंसराज उंदीरवाडे, गुरुदेव सेवा मंडळाचे नानाजी वाढई, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र माहेश्वरी आदी उपस्थित होते.

नामदेवराव गडपल्लीवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नामदेवराव गडपल्लीवार हे खरे लोकनेते व नि:स्वार्थी समाजसेवक हाेते. गडपल्लीवार यांनी विविध आंदाेलनात व सामाजिक कार्यात सहभाग घेतला. स्वतंत्र विदर्भ राज्याचे ते खंदे समर्थक हाेते, असे उद्गार मान्यवरांनी काढले.

याप्रसंगी गुरुदेव सेवा मंडळाचे पंडित पुडके, आर. डी. नानोरीकर, संजय बारापात्रे, दिगंबर रामटेके, बुद्धभूषण कुलसंगे, हर्षवर्धन कुलसंगे, पाैर्णिमा कुलसंगे व अन्य नागरिक उपस्थित होते. विलास निंबोरकर यांनी कार्यक्रमाचे संचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Tributes paid to Namdevrao Gadpalliwar by the organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.