पोलीस शहीद दिनानिमित्त गडचिरोलीत भावपूर्ण श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 14:57 IST2019-10-21T14:56:38+5:302019-10-21T14:57:10+5:30
पोलीस शहीद दिनानिमित्त सोमवारी (दि.21) गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात शहीद जवान आणि अधिकाऱ्यांना भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.

पोलीस शहीद दिनानिमित्त गडचिरोलीत भावपूर्ण श्रद्धांजली
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोलीस शहीद दिनानिमित्त सोमवारी (दि.21) गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात शहीद जवान आणि अधिकाऱ्यांना भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, जिल्हाधिकारी शेखर सिंग, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्यासह शहीद कुटुंबीय तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी गडचिरोली जिल्ह्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करून नक्षलवादाचा जिल्ह्यातून समूळ नायनाट करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले.