आदिवासींना लवकरच मिळणार खावटीचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST2021-05-07T04:38:36+5:302021-05-07T04:38:36+5:30
आदिवासी समाजातील दुर्बल घटकातील नागरिकांसाठी राज्य शासनाने खावटी याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत दाेन हजार रुपयांचे थेट अनुदान ...

आदिवासींना लवकरच मिळणार खावटीचे अनुदान
आदिवासी समाजातील दुर्बल घटकातील नागरिकांसाठी राज्य शासनाने खावटी याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत दाेन हजार रुपयांचे थेट अनुदान बँक खात्यात जमा केले जाणार आहे, तर दाेन हजार रुपयांचे धान्य दिले जाणार आहे. या याेजनेसाठी चार महिन्यांपूर्वीच अर्ज मागविण्यात आले हाेते. गडचिराेली प्रकल्पातून सुमारे ३८ हजार आदिवासी नागरिकांनी अर्ज केले हाेते. त्यापैकी ३६ हजार अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. दाेन हजार अर्ज शिल्लक आहेत. त्यांची छाननी करण्याचे काम सुरू आहे. राज्यभरात एकूण ११ लाख अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १० लाख अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे.
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १ मे राेजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या याेजनेचा प्रारंभ करण्यात आला. जवळपास एक लाख नागरिकांच्या खात्यात दाेन हजार रुपयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्यात आले. यामध्ये काही गडचिराली जिल्ह्यातीलही नागरिकांना याचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित नागरिकांनाही याचा लाभ दिला जाणार आहे.
काेट
गडचिराेली जिल्ह्यात खावटी याेजनेसाठी गडचिराेली प्रकल्पातून सुमारे ३८ हजार अर्ज प्राप्त झाले आहे. त्यापैकी ३६ अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. काही नागरिकांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित नागरिकांच्या खात्यातही अनुदान लवकरच जमा हाेईल.
आशिष येरेकर
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिराेली