शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे वचन देऊन आदिवासी परिचारिकेवर केला ‎अत्याचार; अहेरीचा कंत्राटदार फरार

By संजय तिपाले | Updated: February 26, 2026 15:53 IST

Gadchiroli : मैत्रीचे नाटक करून एका २७ वर्षीय आदिवासी परिचारिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर लग्नाचे वचन देऊन वारंवार अत्याचार केला.त्यानंतर आरोपीने पीडितेची जात काढून लग्नास नकार दिला, तसेच तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले.

लोकमत न्यूज नेटवर्क‎गडचिरोली : मैत्रीचे नाटक करून एका २७ वर्षीय आदिवासी परिचारिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर लग्नाचे वचन देऊन वारंवार अत्याचार केला.त्यानंतर आरोपीने पीडितेची जात काढून लग्नास नकार दिला, तसेच तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले. ही खळबळजनक घटना २४ फेब्रुवारी रोजी अहेरीत उघडकीस आली. याप्रकरणी  एका कंत्राटदाराविरुद्ध अत्याचार व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून तो फरार झाला आहे.‎​पोलिसांच्या माहितीनुसार, अभिषेक सतीश आईलवार (३०, रा. अहेरी)  असे आरोपीचे नाव आहे.त्याने पीडित तरुणीशी मैत्री केली होती. 'तू मला खूप आवडतेस, आपण लवकरच लग्न करू', असे  आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. जुलै २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या दरम्यान त्याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.‎​तुझी जात वेगळी म्हणत जाळली कागदपत्रे 

‎पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे वचन पूर्ण करण्याऐवजी समाजात बदनामी करण्याची भीती घातली आणि बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा 'तू आदिवासी समाजाची आहेस, तुझी जात वेगळी आहे', असे म्हणत त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. एवढेच नव्हे तर, पीडितेच्या गर्भधारणेचे सर्व पुरावे आणि कागदपत्रेही त्याने जाळून नष्ट केली.‎​हतबल पीडिता अखेर पोलिस ठाण्यात 

‎या जाचाला कंटाळून हतबल पीडितेने अखेर अहेरी पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध कलम ६९, २४१, ३५१(२) भारतीय न्याय संहिता २०२३ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.‎​‎आरोपीचा शोध सुरू 

‎या प्रकरणाचा पुढील तपास अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे हे करत आहेत. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपीने पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे अजय कोकाटे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Contractor absconds after raping tribal nurse on marriage promise.

Web Summary : A contractor in Aheri allegedly raped a tribal nurse after promising marriage, then refused due to her caste and forced an abortion. Police have registered a case under atrocity laws; the accused is absconding.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी