पर्यटकांची पावले मेडिगड्डा धरणाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:41 AM2019-07-31T00:41:29+5:302019-07-31T00:42:12+5:30

तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडिगड्डा धरणाचे मागच्या महिन्यात लोकार्पण झाले. सदर धरण आता पावसामुळे चांगलेच भरले असून हे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची पावले तिकडे वळत आहेत.

Traveler steps towards Medigadda dam | पर्यटकांची पावले मेडिगड्डा धरणाकडे

पर्यटकांची पावले मेडिगड्डा धरणाकडे

Next
ठळक मुद्देसागराप्रमाणे दिसते दृश्य : प्रभावित गावांच्या अडचणीत होणार वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडिगड्डा धरणाचे मागच्या महिन्यात लोकार्पण झाले. सदर धरण आता पावसामुळे चांगलेच भरले असून हे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची पावले तिकडे वळत आहेत.
सिरोंचा तालुका व तेलंगणा राज्याची सीमारेषा विभाजीत करणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने शेकडो रुपये खर्चून धरण बांधले. या धरणाचे २१ जून रोजी लोकार्पण करण्यात आले. अंकिसा व मोहला टेकडा या गावांचे स्मशानघाट गोदावरी नदीजवळ आहेत. तसेच या ठिकाणी समक्का सारक्काची जत्रा भरते.
आदिवासी समाजातील नागरिकही गंगास्नानासाठी गोदावरी नदी पात्रात जातात. मात्र मेडिगड्डा बॅरेजचे पाणी जमा झाल्याने वाट काढताना अडचण जाणार आहे. धरणाचे पाणी अडविल्याने गोदावरीचे पात्र अथांग सागराप्रमाणे दिसत आहे. हे नयनरम्य दृश्य बघण्यासाठी तेलंगणा व सिरोंचा, अहेरी तालुक्यातील अनेक पर्यटक मेडिगड्डा धरणाला भेट देत आहेत.
गोदावरी नदी महाराष्ट्र व तेलंगणाची विभाजक आहे. त्यामुळे या नदीच्या पाण्यावर दोन्ही राज्यांचा हक्क आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने योग्य ती पावले उचलली नसल्याने या पाण्याचा संपूर्ण लाभ तेलंगणा होत आहे.
महाराष्ट्रातील गावांना मात्र केवळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्राचे शासन मात्र टोकावर असलेल्या आदिवासी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
धरणाला लावले आहेत एकूण ८४ दरवाजे
गोदावरीचे विस्तीर्ण पात्र अडवून धरण बांधण्यात आले आहे. नाशिक येथील त्र्येंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. पूर्ण महाराष्ट्र पालथा घालत ही नदी सिरोंचापर्यंत येते. सिरोंचाजवळ गोदावरीचे विस्तीर्ण पात्र आहे. त्यामुळे मेडिगड्डा धरण सुध्दा आकाराने मोठे आहे. या धरणाला एकूण ८४ दरवाजे बसविण्यात आले आहेत. या धरणाचे पाणी २०० किमी अंतरावर असलेल्या हैदराबादपर्यंत पोहोचविले जाते. या पाण्यामुळे तेलंगणा राज्य सुजलाम सुफलाम होणार आहे.

Web Title: Traveler steps towards Medigadda dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.