शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

१९१ बटालियनचे एटापल्ली तालुक्यात स्थानांतरण

By admin | Updated: June 11, 2016 01:24 IST

पुराडा, मालेवाडा, बेडगाव, कोरची, कोटगुल आदी ठिकाणी १९१ बटालियनच्या तुकड्या कार्यरत होत्या.

नवीन बटालियन तत्काळ पाठवा : कुरखेडा, कोरची तालुक्यात नक्षल्यांना रान मोकळेदयाराम फटिंग देसाईगंजपुराडा, मालेवाडा, बेडगाव, कोरची, कोटगुल आदी ठिकाणी १९१ बटालियनच्या तुकड्या कार्यरत होत्या. मात्र या तुकड्यांचे एटापल्ली तालुक्यात स्थानांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे कुरखेडा, कोरची तालुक्यात नक्षल्यांचा प्रस्थ आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी देसाईगंज, गडचिरोली, धानोरा, अहेरी, एटापल्ली आदी तालुक्यांमध्ये सीआरपीएफच्या बटालियन तैनात करण्यात आल्या आहेत. कुरखेडा, कोरची तालुक्याची जबाबदारी १९१ क्रमांकाच्या बटालियनवर सोपविण्यात आली होती. या बटालियनचे मुख्य कार्यालय देसाईगंज येथे होते व तुकड्या मात्र पुराडा, मालेवाडा, कोरची, कोटगुल या ठिकाणी कार्यरत होत्या. जंगलात नक्षल विरोधी अभियान राबविण्याचे काम या तुकड्यांच्या वतीने करण्यात येत होते. त्याचबरोबर विविध समाजोपयागी कार्यक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागातील जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले जात होते. त्याचबरोबर शासकीय योजनांची माहिती सुध्दा सीआरपीएफच्या वतीने सिव्हिक अ‍ॅक्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येत होती. मात्र या बटालियनचे एटापल्ली तालुक्यात नुकतेच स्थानांतरण करण्यात आले आहे व कसनसूर, हालेवारा, कोटमी, हेडरी, गट्टा या ठिकाणी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एटापल्ली, भामरागड तालुक्यात जरी नक्षलविरोधी अभियान तीव्र होणार असला तरी कुरखेडा, कोरची तालुक्यातील अभियान मात्र थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या कटकारस्थानांना आणखी वाव मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नवीन बटालियन येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ती तत्काळ पाठविण्याची मागणी आहे. दोन बटालियन येणार १९१ बटालियनच्या जागेवर सीआरपीएफच्या नवीन दोन बटालियन येणार असल्याची माहिती आहे. मात्र त्यांच्यासाठी नवीन परिसर राहणार असल्याने या भूभागाची माहिती काढण्यासाठी एक ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तो पर्यंत पोलीस विभागावरच नक्षल विरोधी अभियान अवलंबून राहणार आहे.