प्रशिक्षणार्थी झाले पुन्हा बेरोजगार; युवकांमध्ये वाढला नाराजीचा सूर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 16:49 IST2025-03-08T16:36:09+5:302025-03-08T16:49:52+5:30
सहा महिन्यांचा कालावधी संपुष्टात : दुसरा रोजगार शोधण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ

Trainees become unemployed again; Discontent grows among youth!
गोपाल लाजूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बेरोजगार युवांना प्रशिक्षणासह तात्पुरत्या स्वरूपात रोजगार देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलात आणली. याअंतर्गत सहा महिन्यांचे अस्थायी प्रशिक्षणवजा काम परंतु सदर युवांचा प्रशिक्षण किालावधी २६ पब्रुवारी रोजी संपुष्टात आल्याने त्यांच्यावर आता बेरोजगारीचे संकट कोसळले आहे.
बेरोजगार युवांना रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. सदर योजनेंतर्गत युवांना अस्थायी तत्त्वावर शैक्षणिक अर्हतेनुसार रोजगार उपलब्ध करून दिला. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील युवांना विविध आस्थापनांमध्ये मानधन तत्त्वावर काम करण्याची संधी मिळाली. आता सर्वच युवांना सहा महिन्यांचा कालावधी संपुष्टात आलेला आहे. पुन्हा नव्या रोजगारासाठी धावपळ सुरू आहे.
मुदतवाढीसाठी आंदोलने, निवेदने ठरली निष्फळ
सध्या कार्यरत आस्थापनांमध्ये काम करण्याची मुदत पुन्हा वाढवावी यासाठी युवा प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रत्येक तालुकास्तरावरून शासनाला निवेदन दिले; परंतु त्यांचे आंदोलन, निवेदन कामी आले नाही.
२२७७ बेरोजगारांना सतावतेय भविष्याची चिंता
युवा प्रशिक्षणार्थी विविध आस्थापनांमध्ये कार्यरत होते. त्यांना विविध कार्यालयांत कामाची संधी मिळाल्याने अनुभव आला.
जि.प. शाळांमध्ये ६७७जणांना प्रशिक्षण
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये ६७७ युवांची प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. तेथे त्यांनी अध्यापनाचे काम सहा महिने केले. यानिमित्ताने त्यांना कामकाजाचा अनुभव आला.
असा होता आस्थापनांमधील प्रशिक्षणाचा कालावधी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून जुलै, ऑगस्ट महिन्यात युवांना जिल्ह्यात शासनाच्या विविध आस्थापनांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा कालावधी आता संपुष्टात आलेला आहे.
ग्रामपंचायतमध्येही काम
जिल्ह्यात ४५८ ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे ४५८ युवांची नेमणूक शिपाई/सहायक पदावर करण्यात आलेली आहे. सदर युवा तेथील शिपाईपदाच्या कामापासून संगणक हाताळणी, पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे प्रशिक्षणार्थ्यांनी केली.
संगणक परिचालक ते कार्यालयीन सहायक
- जिल्ह्यातील पोलिस स्टेशन, उपपोलिस स्टेशन व मदत १ केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन युवांची नियुक्ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत करण्यात आलेली होती. याअंतर्गत जिल्ह्यात एकूण २८६ युवांची नियुक्ती करण्यात आली होती.
- याशिवाय विविध आस्थापनांमध्ये सहायक म्हणूनही काम केलेले आहे. सदर कामाचा अनुभव त्यांच्या जवळ असल्याने भविष्यात त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.